ताज्या घडामोडी

आत्माराम मोरे स्मृती कबड्डी: अँटोनिया डिसोझा हायस्कूल सुपर लीगमध्ये  

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या  स्मृतीदिनापासून सुरु झालेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या आंतर शालेय विनाशुल्क  कबड्डी स्पर्धेमधील पहिल्या विभागातून अँटोनिया डिसोझा हायस्कूल – भायखळा संघाने चँम्पियन ऑफ चँम्पियनच्या सुपर लीगमध्ये प्रवेश केला. माझगाव येथील विजय माझगाव क्रीडा मंडळाच्या मैदानावर मनीष भालेकरच्या पकडी व श्लोक मोरेच्या चौफेर चढायांमुळे डिसोझा हायस्कूलने ताराबाई मोडक स्कूलचा ६०-२० असा मोठा पराभव करून विभाग – विजेतेपद पटकाविले. सुजल बोरीचा व आर्यन संसारे यांनी उत्तम खेळ करूनही ताराबाई मोडक स्कूलला विभाग उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. प्रत्यके सामन्याच्या सुरुवातीस व संपल्यानंतर शालेय कबड्डी संघांना तज्ञ कबड्डी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर येथे २१ फेब्रुवारीपासून स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!