ताज्या घडामोडी

भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Spread the love

प्रथमेश क्षीरसागर -इस्लामपूर प्रतिनिधीं

इस्लामपूरदि.१४

वाळव्याचा वाघ आणि शिराळयाचा नाग यांचे मनोमिलन लवकर होणार असून आज पर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या मनोमिलनाने बऱ्याच वर्षांच्या वादावर आता पडदा पडणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व तालुका पंचायतीच्या निवडणुकीत नाईक गटाला किती अस्तित्व मिळणार याची चर्चा आतापासूनच वाळवा तालुक्यातील ४८गावात चांगलीच रंगली आहे
वाळवा तालुक्यातील ४८ गावात माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचा गट अस्तित्वात आहे या गटाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाडिक गटाच्या सहकार्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या गटाचे खरे विरोधक म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हाच गट मानला जातो. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक विकासाची जाळे विणले आहे राष्ट्रवादी काँग्रेसला गट प्रबळ आहे. याअट्टे चाळीसगावात सम्राट महाडिक व राहुल महाडीक यांनी भाजपचा गट मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये गेले आमदार झाले पण त्यांना आमदार असतानाही कोणतेही मंत्रीपद मिळाले नाही त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पाळले नाही अशी नाराजी असतानाही माजी आमदार शिवाजीराव नाईक पुन्हा आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहिले मात्र त्यांना यश मिळाले नाही त्यानंतर भाजप मध्ये चाललेल्या त्यांच्या घुसमटमुळे व त्यांच्या उद्योगाला लागलेल्या मर्गळी मुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा पक्का निर्णय घेतला आहे. त्याचे सुपुत्र रणधीर नाईक यांनी मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन याबाबत चर्चाही केल्याचे समजते त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची खरे विरोधक असणारे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील,आमदार मानसिंगराव नाईक त्यांचे मनोमीलन होणार आहे .या मनोमिलना नंतर वाळवा तालुक्यातील ४८ गावात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. मात्र या बळकटी नंतर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवाजीराव नाईक गटाला किती वर्चस्व मिळते याची चर्चा आता पासूनच कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे . वाळवा तालुक्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाडिक गटच विरोधक उरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!