ताज्या घडामोडी

वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हत्ती गवताची लागवड करावी_ _कु. प्रगती पालांडे

Spread the love

वैभववाडी तालुक्यातील पालांडेवाडी-जांभवडे येथे इंधन निर्मिती प्रकल्प माहिती सत्राचा शुभारंभ

*वैभववाडी/प्रतिनिधी*

जीवाश्म इंधनाला उत्तम पर्याय हत्ती गवतापासून तयार होणारे जैव इंधन आपल्या वैभववाडी तालुक्यात तयार होणार आहे. इंधन निर्मितीला लागणारा कच्चा माल म्हणून हत्ती गवत, चारा गवत हे कमीतकमी पाणी लागणारे आणि भरघोस उत्पादन देणारे पीक आहे. संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या हत्ती गवताची मोठ्या प्रमाणात लागवड करावी जेणेकरून कष्टकरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होऊ शकेल. सर्वसामान्य शेतकऱ्यांला परवडेल अशा किमतीत आपण या कंपनीचे भागधारक होऊ शकता. कंपनीच्या भागधारकांकडून हमी भावाने हे गवत विकत घेतले जाईल असे आश्वसन एमपीओच्या संचालिका कु. प्रगती पालांडे यांनी दिले.
मीरा क्लीन फ्यूल लिमिटेड मुंबईच्या संयुक्त विद्यमाने ‘वैभववाडी जैविक उत्पादक कंपनी’ बायोफ्युएल स्टार्टअप कंपनी ‘ऊर्जा रिजनरेशन प्राइवेट लिमिटेड’ जैव इंधन प्रकल्प वैभववाडी तालुक्यात घेऊन आले आहे. वैभववाडी तालुक्यात ‘ट्रिपल बॉटम लाईन’ आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण विषयावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक व भूमातेची काळजी घेणाऱ्या अशा स्वच्छ इंधनाची निर्मिती करणे, सेंद्रिय खताची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देणे आणि तालुक्यातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे हे आहेत.
या जैव इंधन प्रकल्पाची माहिती देण्याचा शुभारंभ नुकताच पालांडेवाडी-जांभवडे येथील श्री. लक्ष्मी देवी मंदिरात पार पडला. या माहिती सत्रात गावातील जवळपास ८० हून अधिक स्त्री व पुरुष शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली व या प्रकल्पाचे स्वागत केले. जवळपास ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भागधारक होण्याची इच्छा व्यक्त केली असून किमान ५० ऐकर मध्ये याची लागवड या गावात होणार आहे. असे आश्वासन दिले आहे.
या माहिती सत्राला व्यासपीठावर ‘ऊर्जा रिजनरेशन प्राइवेट लिमिटेड एमपीओच्या संचालिका कु. प्रगती पालांडे, सरपंच वैदेही गुरव, पोलीस पाटील विजय वाडेकर, श्रीधर पालांडे, मधुकर गुरव यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच गावातील इतर मान्यवरांनीही उपस्थिती दर्शविली पंढरीनाथ पवार, श्रीधर रांबाडे, वसंत पवार, सोनबा कोकरे यांनी आपली मनोगते मांडली.
श्रीधर रांबाडे हे गेली अनेक वर्षे शेअर बाजार येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांना शेअर्सबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शेअर्सचे महत्त्व पटून दिले. वैभववाडी जैविक उत्पादक कंपनी मध्ये भागधारक असणाऱ्या १५ हजार शेतकऱ्यांना देखील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार. या गावातील जास्तीत जास्त पडीक जमीन लागवडी खाली आणण्याचा प्रयत्न असेल ज्या मधून स्थानिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ होईल. अशी माहिती ‘ऊर्जा रिजनरेशन प्राइवेट लिमिटेड एमपीओच्या संचालिका कु प्रगती पालांडे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!