आरोग्य व शिक्षण

विज्ञान शिक्षक, कोल्हापूर या शिक्षक गटाचा अनोखा उपक्रम

Spread the love

विज्ञान शिक्षक, कोल्हापूर या गटाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून व्हर्च्युअल पद्धतीने एकत्र येऊन कोल्हापूर जिल्हांतर्गत विज्ञान पंधरवडा २०२२ आयोजित केला आहे.

👉🏻यामध्ये शिक्षकांसाठी दर शनिवारी फोटो वर्णन स्पर्धाविविध व्हॉटसॅप ग्रुप वरुन प्रसिद्ध केली जाते आणि त्यांचा निकाल दर शुक्रवारी जाहीर करून विजेत्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र दिले जाते. याचे परीक्षण मान्यवर साहित्यिक, विज्ञान लेखक यांच्याकडून केले जात आहे.
👉🏻तसेच जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांसाठी विज्ञान शिक्षक अभियोग्यता चाचणी दर तिसऱ्या दिवशी घेतली जात आहे. यामध्ये सहभागी शिक्षकांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र दिले जाते.
👉🏻विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटांत विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. यातील उच्चतम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र दिले जाते.
👉🏻तसेच शिक्षकांसाठी शास्त्रज्ञांच्या कोटेशन्सचा संग्रह, शिक्षकांचे स्वलिखित विविध साहित्य (विज्ञानकथा, चारोळ्या, लेख, कविता,इ) संकलन, तालुक्यानुसार शिक्षक संचिका एकत्रीकरण, जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची मुलाखत असे अनेक उपक्रम २८ फेब्रुवारी पर्यंत राबविले जाणार आहेत. यातील बरेचसे उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा विज्ञान शिक्षक, कोल्हापूर या गटाचा मानस आहे.
या उपक्रमामध्ये श्रीशैल मठपती, राजेश पिष्टे, ओंकार कुलकर्णी, डॉ सचिन कोंडेकर, सुधीर आमणगी, मधुकर पाटील, विशाल पोतदार, मनोहर संकपाळ, प्राजक्ता पाटील, उमा जाधव, सतिश चिप्रीकर आणि जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांचा सहभाग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!