आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज पुरस्कार जाहीर..

कार्यक्रम दि.२१ रोजी सायं. ५ ते ८ या वेळेत पं.जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

Spread the love

नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज पुरस्कार जाहीर..Nritya Samrat Pt. Birjumaharaj Award Announced..

आवाज न्यूज :  चिंचवड प्रतिनिधी,१६ जुन.

नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी व कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने पं. बिरजूमहाराज यांच्या नावाने देण्यात येणारा दुसरा नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज राष्ट्रीय पुरस्कार मुंबई च्या जेष्ठ कथक नर्तिका पदमा शर्मा व आसाम चे जेष्ठ कथक नर्तक बिपुल चन्द्र दास यांना देण्यात येणार आहे. तर, नृत्य सम्राट पं. बिरजूमहाराज युवा पुरस्कार बनारसचे कथक नर्तक सौरव व गौरव मिश्रा यांना देण्यात येणार आहे. सन्मान चिह्न, मानपत्र, शाल व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्यास आमदार उमा खापरे व उद्योजक कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर नर्तिका पद्मा शर्मा, नर्तक बिपुल चन्द्र दास, नर्तक सौरव- गौरव मिश्रा यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम या द्वितीय नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज नृत्य महोत्सवात होणार आहे. हा कार्यक्रम दि.२१ रोजी सायं. ५ ते ८ या वेळेत पं.जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

कार्यक्रमास कुठलेही प्रवेश मुल्य नाही. या आधी पं.बिरजूमहाराज यांच्या नावाने दिला जाणारा पहिला नृत्य सम्राट पं. बिरजूमहाराज पुरस्कार दिल्लीच्या पद्मश्री शोवना नारायण व पं.दीपक महाराज यांना देण्यात आला होता, अशी माहीती केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!