ताज्या घडामोडी

मंथन स्कूल आँफ आर्टचा वर्धापन दिन जल्लोशपूर्ण वातावरणात संपन्न ; माजी विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आनं

Spread the love

मुंबई येथील मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्टच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात जवळपास ७० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हे सर्वच माजी विद्यार्थी सध्या क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग क्षेत्रात विशेष प्राविण्यासह कार्यरत आहेत.
मंथन स्कूलच्या या हर्षमयी सोहळ्यामध्ये यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासन कला महोत्सवामध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. मंथन स्कूल आज २०वर्ष मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाहिरात कला विषयात अग्रेसर आहे. मंथन स्कूलला व विद्यार्थ्यांना अनेक राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले असुन सामाजिक, शैक्षणिक संस्थांनीही यांच्या कार्याचा गुणगौरव केला आहे.
मंथन स्कूलने कला क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचे शैक्षणिक काम केले आहे. सामाजिक भावना, कलात्मक दर्जा व कलेतून उदरनिर्वाह हे मुख्य हेतू ठेवून या संस्थेचे संस्थापक तथा सर्वेसर्वा प्रा.शशिकांत गवळी यांनी हे कलाशिक्षणाचे कामकाज अविरत सुरु ठेवले आहे.
सदर भव्यदिव्य कार्यक्रमाला मॅकॅन वर्ल्ड अँड एजेन्सीचे वरिष्ठ क्रिएटिव्ह डायरेक्टर विक्रम डेंबरे,बाॅलिवूड आर्ट डायरेक्टर निशीकांत खानोलकर,सलिम शाह,मोटीवेशनल कोच सिमा देसाईनायर,मुद्रण शास्त्र तज्ञ संजय साळुंखे, औरंगाबाद कलामहाविद्यालयाचे प्रा.पवन भिसे,रत्नागिरीहून कलाध्यापक संदेश पालये,मंथनचे सर्व अध्यापकगण,पदाधिकारी उपस्थित होते.
सध्यस्थितीत मंथनचे कार्य हे मुंबई,पुणे,औरंगाबाद येथे सुरु आहे.येत्या काही दिवसात मंथनचे शैक्षणिक दालन रत्नागिरीत सुरु होणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना डिझाईन, अँडव्हर्टायझिंग व प्रिंटींग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठा प्लॅटफाॅर्म मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!