ताज्या घडामोडी

साखराळे येथील मॉडर्न हायस्कुल मध्ये “जयंत करियर सप्ताह”.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

साखराळे (ता. वाळवा) येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘‘जयंत करीयर सप्ताह’’ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रारंभी लोकनेते कै. राजारामबापू पाटील व कै. कुसूमताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी व्यवसाय व उद्योगधंदे याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. या समारंभास मुख्याध्यापक आर. आर. बडवे, संस्थेचे कार्यध्यक्ष विजय मोरे, उपकार्यध्यक्ष शिंदे मॅडम, तांबवेचे प्रशांत मोरे, नितीन यादव तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, विध्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!