ताज्या घडामोडी

शिराळा शहरातील 3 कोटी 80 लाख रु.विकास कामांचा गुरुवारी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

शिराळा (प्रतिनिधी)

शिराळा शहरातील विविध विकास कामांसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ३ कोटी ८० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गुरूवारी (ता. १७) होणार आहेत. ही माहिती सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, शिराळकर व मानसिंगभाऊ यांचे अतूट नाते आहे. येथील लहान-थोर, माता-भगिनी, युवक-युवती यांच्याशी नाईक कुटूंबीयांचा जिव्हाळा कायम आहे. म्हणूनच शिराळ्यातील नागरिक प्रत्येक काळात सातत्याने मानसिंगभाऊ यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे शिराळा शहराच्या विकास सातत्याने आमदार भाऊंनी प्रयत्न केले आहेत. नगरपंचायतीकडूनही विविध विकास साधला जात आहे. तसेच नाविण्यपूर्ण उपक्रमही राबविले जात आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात आमदार नाईक यांनी शिराळा शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे 15 कोटी रुपयांहून अधिक निधी आणला आहे. त्यापैकी कांही विकास कामासांचा शुभारंभ होत आहे. यावेळी नगरपंचायत, विश्वास व विराज उद्योग समुहातील पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित असतील. आमदार मानसिंगभाऊ यांच्या हस्ते खालील कामांचा शुभारंभ होईल.
महत्वाच्या कामाचे नाव व कंसात किंमत : नेताजी पाटील घर ते बद्रु मिस्त्री घरापर्यंतचा रस्ता करणे (५.६८ लाख), सुवर्णा जाधव घर ते उदय गायकवाड घर आर सी सी गटर करणे (५.७१ लाख), राजाराम कुरणे घर ते तानाजी कुरणे घरापर्यंत रस्ता व गटर करणे (१०.३७ लाख), नवजीवन वसाहत ते कदमवाडी रस्ता डांबरीकरण व गटर करणे (५०.०० लाख), शिव मंदीर ते मासाळ मामा घरापर्यंत रस्ता करणे (४.३६ लाख), मटन मार्केट चौक ते डी सी सी बँक (वडर गल्ली) आर सी सी गटर व काँक्रीटीकरण करणे (८.८८ लाख), डवरी वस्ती (कॉलेज रस्ता) हनुमान मंदिर रस्ता आर सी सी करणे (३.३४ लाख), नाथ रोड सर्जेराव निकम घर ते आनंदराव धुमाळ घरापर्यंत रस्ता करणे (१२.६७ लाख), भीमराव कांबळे सर घर ते वामन मिरजकर घर पर्यंतचा रस्ता करणे (६.४० लाख). अँड. कुंभार यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (१०.०० लाख), हिरवडेकर घर ते गायकवाड सर घरापर्यंतचा रस्ता करणे (४.५० लाख), मोरणा धरण रोड गटर व डांबरीकरण करणे (५०.०० लाख), एम.आय.डी. सी रोड ते विश्वास महिंद घर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (१०.०० लाख), एम. आय. डी. सी रोड ते विश्वास पांढरे घर पयंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे (१३.०० लाख), बालाजी फर्निचर ते जयराज धाबा पर्यंतचा रस्ता व गटर करणे (५०.०० लाख), घुमट वस्ती ते शिवणी रस्ता डांबरीकरण करणे (३०.०० लाख), दिवाणी न्यायालय संरक्षक भिंत बांधणे (२०.०० लाख).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!