आरोग्य व शिक्षण

बेशिस्त ऊस ट्रॉली तळेगाव हद्दीत बंद करा अन्यथा आंदोलन करणार – किशोर आवारे

Spread the love

तळेगाव : बेशिस्त ऊस ट्रॉलीची वाहतूक तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्यात यावी अशी मागणी जनसेवा विकास समितीचे सर्वेसर्वा व जनसेवा विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली असून,या बाबतचे लेखी पत्र सचिव मिलिंद अच्युत यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व तळेगाव दाभाडे वाहतूक शाखा यांना दिले आहे.

बेशिस्त दुहेरी ऊस ट्रॉली मुळे अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.अनेक नागरिक अपघात ग्रस्त झाले आहेत.
बेशिस्त ऊस ट्रॉलीची वाहतुक सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत करण्यात यावी अन्यथा जनसेवा विकास समिती रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी तळेगाव स्टेशन मराठा क्रांती चौक येथे आंदोलन करणार आहे.

नियमीत शाळा व क्लासेस सुरू झाल्याने महिला भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चालवीत आहेत. बेशिस्त ऊस ट्रॉली मुळे अपघात होण्याचा धोका अधिक वाढला असल्याने संभाव्य अपघात व त्यातून होणारी जीवित हानी रोखण्यासाठी ऊस ट्रॉली ची वाहतूक तळेगाव शहरात बंद ठेवण्यात यावी असे किशोर आवारे यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!