ताज्या घडामोडी

चेंबूरमधील ज्येष्ठ कवी महादेव जाधव यांच्या गीतांचा अल्बम प्रदर्शित!

Spread the love

मुंबई – आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,जेष्ठ पत्रकार, कवी, जलसाकार महादेव जाधव यांच्या ‘ तनात जोवर जीव आहे ‘ नावाच्या गीतांचा अल्बम माजी बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. युट्युबवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या अल्बमला चांगले व्ह्यूव मिळत आहे.

आंबेडकरी विचारांची चळवळ खेडोपाड्यात पोहचविण्यासाठी ६० ते ८० च्या दशकात जेष्ठ पत्रकार, कवी, गायक जलसाकार महादेव जाधव यांनी कोकणातील असंख्य गावे पिंजून काढली. आपल्या कलापथकातून बाबासाहेबांचे विचार पोहचवण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले. त्यांची असंख्य लोकप्रिय गीते आहेत मात्र अद्याप ती रेकॉर्डिंग झाली नाहीत. अशी गीते अल्बमच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते शांताराम जाधव यांनी गायली असून त्याला जयेंद्र भांडे यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचा अल्बम प्रदर्शन सोहळा चेंबूरच्या घाटले गावात संपन्न झाला. माजी बेस्ट समिती अध्यक्ष नगरसेवक अनिल पाटणकर यांनी या अल्बमचे लोकार्पण केले. यावेळी जनहीतवर्धनी फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटणकर, उपनगर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष आनंद श्रीवास्तव, पत्रकार प्रसाद जाधव, श्री विश्वकर्मा समाज मंडळाचे अध्यक्ष राजेश पांचाळ, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४२४ चे अध्यक्ष, कवी चंद्रकांत जाधव, प्रसिद्ध तबलावादक पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!