ताज्या घडामोडी

नाशिक,देवळाली मतदार संघातील लाखलगाव-गंगापाडळी निरगुडे वस्तीचा नुतन रस्ता म्हणजे ग्रामस्थांना भेटस्वरूप दिलेले अपघात केंद्रच -.सुवर्णा भिकचंद दोंदे यांचा घणाघात

Spread the love

नाशिक,देवळाली मतदार संघातील,लाखलगाव-गंगापाडळी,निरगुडे वस्ती येथील नवीन बनविलेल्या रस्त्याच्या समस्या दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्याकडे लाखलगाव-गंगापाडळीच्या नागरीकांनी मांडल्या,त्याची तात्काळ दखल घेतली.

प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी निरगुडे वस्ती वरील नुतन रस्त्याला भेट देऊन तिथल्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे,आता रस्त्याला साईडपट्टी करण्याचे काम हे ग्रामपंचायतचे आहे आमचे नाही,असे उत्तर देवळाली मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधी आदरणीय सौ.सरोज अहिरे यांनी देऊन हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत ही शोकांतिका ग्रामपंचायत उपसरपंच श्री.आत्मारामजी दाते व ग्रामपंचायत सदस्यांकडून मांडण्यात आली,तसेच ग्रामस्थांनी स्वता: दैनंदिन जीवनात वाहतुकीच्या निरगुडे वस्तीच्या रस्त्यावर काय दिव्य तारेवरची कसरत करावी लागते,रोजच अपघात होताहेत,निरगुडे वस्ती जवळ राहणारे जेष्ठ ग्रामस्थ श्री.सुर्यभानजी कांडेकर यांचा याच रस्त्यावर गाडीचा तोल जाऊन पाय फ्रॅक्चर झाला आहे,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राख टाकुन कार्यभाग साधण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार सौ.सरोज अहिरे यांनी केला आहे हे आक्रोशपुर्ण भावनांनी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

निरगुडे रस्त्याच्या साईडपट्टीचे काम स्थानिक पातळीवर लवकरात लवकर मार्गी नाही लागले तर ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेऊन मार्गक्रमण करतील असेही समस्त ग्रामस्थांच्या वतीने नमुद करण्यात आले.
तसेच असा रस्ता समस्त लाखलगाव-गंगापाडळी ग्रामस्थ यांना बनवून देऊन विद्यमान आमदार आदरणीय सौ.सरोज अहिरे यांनी जणू काही ग्रामस्थांना रस्त्याच्या माध्यमातून “दैनंदिन अपघात केंद्रच” भेट स्वरूप दिले आहे,असे प्रतिपादन प्रो‌.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यावतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!