ताज्या घडामोडी

श्री.आदित्यजी ठाकरे यांचे समोर खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखालील अमेझिंग चांदोलीचे सादरीकरण

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येणारे चांदोली धरण व चांदोली अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र निर्माण करण्याच्या अनुषंगाने आज खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली अमेझिंग चांदोलीचे सादरीकरण महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासमोर करण्यात आले या वेळी खासदार धैर्यशील माने यांनी चांदोली येथे असणारे नैसर्गिक साधनसंपत्ती व जैवविविधता याची माहिती पर्यावरण मंत्र्यांना दिली व चांदोली धरण व अभयारण्य एक मॉडेल म्हणून डेव्हलप केल्यास महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन केंद्र बनू शकते हे मंत्रिमहोदय यांच्या निदर्शनास आणून दिले. अमेझिंग चांदोलीचे राजीव पाटील व त्यांच्या टीमने तयार केलेले सादरीकरण मंत्रिमहोदय यांच्यासमोर सादर करून मंत्रिमहोदयांना सविस्तर माहिती दिली.
तसेच खासदार धैर्यशील माने यांनी चांदोली बरोबरच शिराळा येथील भुईकोट किल्ला, शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनखिंड, विशाळगड यासह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी भरघोस निधीची मागणी पर्यटनमंत्री मा.ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागणीवर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यची ठाकरे यांनी याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या व आराखडा तयार झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्यासमवेत बैठक घेऊन जास्तीत जास्त निधी देणार असल्याचेही सांगितले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ.व्ही.क्लेमेंट बेन, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर, आमदार ऋतुराज पाटील,आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार श्रीमती डॉ.निवेदिता माने वहिनीसाहेब, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अमेझिंग चांदोलीचे राजीव पाटील, रमण कुलकर्णी, विनायक गायकवाड, लक्ष्मण जाधव, प्रताप जोशी, अर्जुन बिराजदार, सुयोग पाटील यांच्यासह पर्यावरण, पर्यटन व वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!