ताज्या घडामोडी

इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इस्लामपूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यां चा आरोग्य विमा काढावा- नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांना निवेदनसादर

Spread the love

इस्लामपूर दि.२३ प्रतिनिधी
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इस्लामपूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यां चा आरोग्य विमा काढावा,असे निवेदन नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांना दिले. श्री.साबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गट नेते संजय कोरे यांनी श्री.साबळे यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटाने अनेक कुटुंबांच्या समोर आर्थिक प्रश्न निर्माण केले आहेत. नगर पालिकेचे कर्मचारी हे मध्यमवर्गीय कुटुंबा तील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. आबासो तुकाराम साळुंखे या प्रामाणिक व एकनिष्ठ कर्मचऱ्यास दोन वर्षा पूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ते एक मोठ्या चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास दाखल झाले होते. त्यांचे उपचाराचे बिल १ लाख ४० हजार झाले होते. ते भरल्याशिवाय त्यांना हॉस्पिटल मधून सोडणार नाही,असे त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी घरातील सोने आदी गहाण ठेवून ते बिल भरून डिस्चार्ज घेतला. त्यांनी पुढे इस्लामपूर येथील ऊपजिल्हा रुग्णालयात उपचार घेवून ते बरे झाले व नगरपालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्यावेळी नगरपालिकेने त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे होते. मात्र नगर पालिकेने काहीही केले नाही,ही खेदाची बाब आहे. म्हणून नगरपालिकेने आता नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा घ्यावा,म्हणजे एखाद्या आजारपणात या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते,असे निवेदनात म्हंटले आहे.यावेळी उदय कांबळे,राहुल नागे,शकील जमादार, पांडुरंग कांबळे, अविनाश सावंत, प्रशांत उरूनकर,सलमान झंजी, बजरंग चव्हाण,रणजित चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गट नेते संजय कोरे. समवेत शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,कार्याध्यक्ष स्वरूप मोरे व कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!