आरोग्य व शिक्षण

कलापिनीच्या डॉ.शं.वा.परांजपे बालनाट्य स्पर्धेत “शिव मंगल स्वर नाट्यधारा”प्रथम

Spread the love

तळेगाव : कलापिनीच्या कै.डॉ.शं.वा.परांजपे स्मृती
बाल कथा नाट्य स्पर्धेत तळेगाव दाभाडे,पिंपरी चिंचवड,पुणे येथील एकूण १२ संघ सहभागी झाले होते. दरवर्षी आधी पेक्षा उत्तरोत्तर नाटकांच्या सादरीकरणात झालेली प्रगती प्रकर्षाने जाणवते.ह्या वर्षी बाल कलाकार आणि प्रौढ कलाकार यांच्या एकत्रित सहभागाने बाल कथा नाट्य रूपांतर करून सादर केल्या होत्या.

लहान मुलांचे मनमोकळे हसू,त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दिलेला प्रतिसाद, प्राण्यांच्या कडे बघून त्यांना वाटलेली मज्जा..सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यातील त्यांना कळलेला विनोद हे पाहून तळेगाव मधील मुलांच्यात प्रेक्षक म्हणून झालेली प्रगती पाहून परीक्षकांना आणि पालकांना पण खूप आश्चर्य आणि समाधान वाटले.

या स्पर्धेच्या परिक्षणासाठी नयना डोळस, श्रिया रहाळकर आणि  श्रीधर कुलकर्णी ह्यांनी परीक्षक म्हणून काम केले.

आपले नाटक करायचेच पण इतर संघांची नाटके पण बघावित,त्यांचे निरीक्षण करावे.मुलांना नाटक पाहण्याचा आनंद घेऊ द्यावा.मुलांना त्यांच्या पर्यंत अर्थ पोहोचणारे विषय त्यात असावेत. तसेच कलापिनी तर बाल भवन आणि कुमार भवन सारखे मुलांच्या साठीचे उपक्रम सुरू आहेत त्याचा सर्व पालकांनी आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रगती साठी उपयोग करून घ्यावा . असे सर्व परीक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले.
एकामागोमाग एक उत्तमोत्तम नाटके सादर झाली. उत्तम अभिनय,उत्तम नेपथ्य,  प्रकाशयोजना, रंगभूषा,वेशभूषा ,संगीत अश्या सर्व बाबतीत नाटके उत्तम होती.त्यामुळे प्रेक्षक त्यात रंगून गेले होते.

ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.आनंद आसवले , रश्मी आसवले तसेच प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.प्रफुल्ल काशीद हे उपस्थित होते. त्यांनी कलापिनी संस्थेच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.प्रफुल्ल काशीद यांनी “नाटक हे मनातल्या भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.तसेच जे लिहू शकतात त्यांनी सतत लिहिते राहा असे सांगितले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कलापिनी चे अध्यक्ष श्री.विनायक अभ्यंकर तसेच कार्यकारिणी सदस्य श्री.विनायक भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.कलापिनी चे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले.

या स्पर्धेच्या तांत्रिक…लाइट्स, माईक ची उत्तम व्यवस्था शार्दुल गद्रे याने खगेश जोशी,अभिलाष भावर,जितेंद्र पटेल,हरीश पाटील,वेदांग महाजन, स्वच्छंद गंदगे,अनुजा झेंड यांच्या सहकार्याने सांभाळली. संपूर्ण स्पर्धेचे उत्तम व्यवस्थापन कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे यांच्या मार्गदर्शना खाली रश्मी पांढरे, श्रीपाद बुरसे, केतकी लिमये, दीपक जयवंत, दीप्ती आठवले, रामचंद्र रानडे यांनी केले.बक्षीस समारंभ चे सूत्र संचालन मधुवंती रानडे आणि  विराज सवई यांनी केले.तर आभार  विनायक भालेराव यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे….

सांघिक

प्रथम…नाटक..खरे मित्र
शिव मंगल स्वर नाट्य धारा
पुणे.

द्वितीय… दार उघडा बाळांनो
किलबिल संघ …तळेगाव दाभाडे

तृतीय..हुब्रा डुंबरा
आनंद नगर ग्रूप
तळेगाव दाभाडे.

उत्ते.१) ढगांनो शांत व्हा.

नाटकांची शाळा..पुणे
२)वेळच्या वेळी.
स्वच्छंद ..पुणे

लक्षवेधी…प्रोजेक्ट मेरी गोल्ड…जैन इंग्लिश स्कूल
तळेगाव दाभाडे.

दिग्दर्शन…
प्रथम..अस्मिता परांजपे
खरे मित्र
द्वितीय..विजय कुलकर्णी
दार उघडा बाळांनो
तृतीय..अश्विनी अंबिके
ढगांनो शांत व्हा.
लेखन…
प्रथम.. ज्योती ढमाले
द्वितीय..अंजली कऱ्हाडकर
तृतीय. ज्योती माटे/
अश्विनी अंबिके

वेश भूषा/रंग भूषा
प्रथम..वेळच्या वेळी
द्वितीय..हुंब्रा दुंबरा

रंगमंच रचना.. ढगांनो शांत व्हा

संगीत..खरे मित्र
संगीत साथ.. ढगांनो शांत व्हा

अभिनय..मुले
प्रथम..विनीत पारखी
द्वितीय..चिराग वाघमारे
तृतीय..ओम साळुंखे
उत्ते.देवांश चिंबळकर

अभिनय…मुली
प्रथम… अद्वैता कुलकर्णी
द्वितीय..आर्या परांजपे
तृतीय..शांभवी जाधव
ऊते..स्पृहा भावे
गीत सागज कर
प्रौढ कलाकार..
प्रथम..श्री.रवींद्र पांढरे
द्वितीय..विजय कुलकर्णी
तृतीय..तृप्ती कुलकर्णी.

https://photos.app.goo.gl/KXRtQc81JpaRdRB87

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!