ताज्या घडामोडी

सिडीएससीए चषक क्रिकेट स्पर्धा २८ फेब्रुवारीपासून

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित मर्यादित ४५ षटकांच्या लेदर बॉल सिडीएससीए चषक वासंतिक क्रिकेट स्पर्धा २८ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. साखळी स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. या संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील आघाडीच्या दोन संघांना बाद फेरीत प्रवेश देण्यात येईल. स्पर्धेतील सामने साखळी आणि नंतर बाद पध्दतीने खेळवण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे संयोजक राहुल कदम यांनी सांगितले. स्पर्धेतील सामने ठाण्यासह मुंबईतील ओव्हल, आझाद मैदान, शिवाजी पार्क, सोनाळे मैदान, इंनफाइट आदी ठिकाणी खेळवण्यात येतील. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यादरम्यान सामनावीर, तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!