ताज्या घडामोडी

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा चिखली येथे शुभारंभ

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिखली (ता. शिराळा) येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक व विश्वासराव नाईक कारखान्याच्या संचालकांच्या उपस्थितीत झाली. मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातील लोकांपर्यंत पोहचून त्याना शासकीय व इतर वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सेवाभावी वृत्तीने निशुल्क करतील. नागरिकांनी अभियानात विभागवार काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा व आपली कामे करून घ्यावीत त्यासाठी प्रतिनिधीचे नाव व मोबाईल क्रमांक देत आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी दिली. मांगले जिल्हा परिषद मतदार संघ : अभिजीत यादव (9834826728), वाकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघ : राकेश सवाखंडे (7776066201), कोकरूड जिल्हा परिषद मतदार संघ : वैभव गिरीगोसावी (8999980959) पणुंब्रे तर्फ वारुण जिल्हा परिषद मतदार संघ : शंकर बोरगे (8600009929). या अभियानाचे कार्यालय विराज ग्रुप ऑफ इंडस्टीज शिराळा आहे. मुख्य समन्वय म्हणून उदय पाटील (9860277999) आहेत. याची नोंद सर्वांनी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!