ताज्या घडामोडी

शिर्डीत लहुजी सेनेच अनोखं आंदोलन आंदोलन करताच जागे झाले प्रशासन

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी:-नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल बंधन समोर मोठा रस्त्याला खडा पडला असून त्यामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात या अपघातातून साईभक्त शालेय विद्यार्थी ग्रामस्त यांचा मानसिक त्रास कमी व्हावा म्हणून भारतीय लहुजी सेनेच्या वतीने शिर्डी प्रांत कार्यालय नगर पंचायत यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन देऊन हा खडा त्वरित बुजविण्यासाठी अनेक वेळा मागणी केली होती मात्र प्रशासन चाल ढकल पणा करीत असल्यामुळे आज न उद्या निष्पाप लोकांचा बळी न जाऊ ह्या हेतूने मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता अनोखे गांधीगिरी मार्गाने जागरण गोंधळ करून प्रशासनाचे लक्ष वेधले या आंदोलनात भारतीय लहुजी सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर वीर परशुराम साळवे भाऊसाहेब आव्हाड मं जाबापू साळवे दिपक साळवे विश्वदीप पिंगळे रुपेश आरणे आदींनी सहभाग घेतला शिर्डी हे साईबाबा मुळे आंतर राष्ट्रीय तीर्थस्थान बनले असून इथे साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात इतर अवजड वाहने ही मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात मात्र नगर मनमाड महामार्गावरील हा खडा उद्या मृत्यूचा सापळा बनू शकतो खड्यात वाहने आदळून अनेक गाड्यांचे टायर फुटतात खड्यामुळे ब्रेक मारल्याने वाहने एकामेकावर येऊन धडकतात म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर खड्याच्या ठिकाणी फुल हार नारळ अर्पण करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळाचे लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने हालगी वाजवत अनोखे आंदोलन केले यावेळी रामभाऊ पिंगळे यांनी पोतराज वेष परिधान करून देवीचा गोंधळ केला या आंदोलनामुळे या खड्याजवळ येणारी जाणारी वाहने थाबली सर्वांनी या आंदोलनाचे कौतुक केले याच ठिकाणावरून वाजत गाजत शिर्डी प्रांत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन सदर खडा दुरुस्त करण्याची मागणी आंदोलन कर्त्यांनी केली सदर मागणीची त्वरित दखल घेऊन प्रांताधिकारी यांनी सदर खडा त्वरित बुजविण्याचे नगर पंचायत ला आदेश दिले नगरपंचायत विभागाने ही सदर खडा त्वरित दुरुस्त करून शिर्डीकरा ना साईभक्तांना शालेय मुलांना शिर्डीकरांना न्याय दिला या आंदोलनाची शिर्डी शहरात जोरदार चर्चा होती या आंदोलनासाठी लहुजी सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी शिर्डी पोलिस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल श्री वेताळ व पगारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.*

*चौकट:-चक्क प्रांतसाहेबच म्हणाले की या खड्याच्या अपघातातुन मी बालबाल बचावलो*
*मागणीचे निवेदन प्रांताधिकारी श्री गोविंद शिंदे यांना देत असताना आपण या खड्या दुरुस्तीची मागणी करत आहात त्या खड्याच्या अपघातपासून मी दोन दिवसांपूर्वी मी सदर ठिकाणी प्रवास करत असताना माझ्या वाहन चालकाने गाडीचा वेग मर्यादित केल्याने मी साई बाबांच्या शिर्डी करांच्या सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादामुळेच बाल बाल बचावलो त्यामुळे हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे मी हे माझे कर्तव्य समजतो असे त्यांनी सांगितले*

चक्क पत्रकार झाले पोतराज

या आंदोलनाच्या जागरण गोंधळ प्रसंगी देवीचे पोतराज म्हणून रामभाऊ घोरपडे यांना आमंत्रित केले होते मात्र आंदोलनाच्या वेळी पोतराज यांची तब्बेत बिघडल्याने पत्रकार रामभाऊ पिंगळे यांनी पोतराजाची भूमिका पार पाडून सदर वेष परिधान करून हालगी वाद्य वाजवून आंदोलनामध्ये मोठा सहभाग घेतला मात्र ही समाजसेवा म्हणजे साईंची सेवा असल्याने आपल्याला आत्मिक आनंद झाले असल्याचे पत्रकार पिंगळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!