क्रीडा व मनोरंजन

आत्माराम मोरे स्मृती शालेय कबड्डी: हशू अडवाणी स्कूल सुपर लीगमध्ये

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

गोवंडी येथील श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलने चौथ्या टप्प्यातील विभाग विजेतेपदासह ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर शालेय विनाशुल्क कबड्डी स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये धडक मारली. अडवाणी स्कूलने श्री गणेश इंग्लिश विद्यालय – वडाळा संघाचा २५ गुणांनी पराभव केला. धीरेन सोळंकी व कौशिक पाटील यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने माजी राज्य कबड्डीपटू भरत शिंदे यांनी गौरविले.

आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित आंतर शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये धीरेन सोळंकीच्या चौफेर चढाया आणि दक्ष सुखदरेचा अष्टपैलू खेळ, यामुळे अडवाणी स्कूलने गणेश विद्यालया विरुद्ध प्रथमपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत ४७-२२ असा विजय संपादन केला. पराभूत संघाच्या कौशिक पाटीलने चढाईचा छान खेळ केला. उत्कर्ष विद्या मंदिर-कांदिवली, श्री एमबी हायस्कूल-विलेपार्ले, आदर्श विद्यालय-डोंबिवली, मातोश्री रमाबाई गायकवाड विद्यालय-कल्याण आदी संघांमध्ये पाचवा टप्पा २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वा. संयोजक अश्विनीकुमार मोरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरहिंद मंडळ-दादर पश्चिम येथे सुरु होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!