आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

कलापिनीच्या बाल कथानाट्य स्पर्धा २०२३.. उत्साहात संपन्न.!

स्पर्धांचे ४५ वे वर्ष.............

Spread the love

कलापिनीच्या बाल कथानाट्य स्पर्धा २०२३.. उत्साहात संपन्न.!
स्पर्धांचे ४५ वे वर्ष………….

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर ,१४ फेब्रुवारी.

कलापिनीच्यावतीने सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या कै. शं.वा.परांजपे स्मृती आंतर शालेय बालकथा नाट्य स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न झाल्या हे स्पर्धांचे ४५ वे वर्ष होते
मुलांच्या अंगभूत कलांना वाव देण्यासाठी कलापिनी संस्था दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करीत असते. प्रत्येक शाळेला आपल्या विद्यार्थ्यांमधील अभिनय गुण अशा स्पर्धांमुळे सगळ्यांपुढे आणता येतात.

यावर्षी सुद्धा पिंपरी चिंचवड , मावळ तालुक्यातील एकूण १९ शाळांचा सहभाग होता. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.या दोन्हीही गटांचे परीक्षण गौरी पाटणकर,  निनाद पाठक आणि  अभिजीत मकाशीर यांनी केले.परीक्षकांनी आपल्या मनोगतात कलापिनी ही संस्था सगळ्या शाळांना तेथील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अशा नाटकांमधून आपल्या विविध गुणांना पुढे येण्याची संधी देत असते. तसेच त्यांच्या कल्पनांना वाव देत असते. कलापिनीला सहकार्य करण्यास आम्हाला आवडेल  अशी ग्वाही दिली.

पारितोषिक वितरणासाठी डॉ. सुहास कानिटकर व डॉ. दत्तात्रय गोपाळघरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ.दत्तात्रय गोपाळघरे यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की तळेगाव येथे कलापिनीसारखी संस्था विविध कलांची जोपासना करीत असते. त्याचा फायदा तळेगावातील सर्व शाळांना होत असतो. लहान वयातच मुलांना त्यांच्यातील गुण दाखवण्याची संधी अशा स्पर्धांमधून मिळत असते.डॉ. सुहास कानेटकर यांना त्यांनी कलापिनी संस्थेसाठी केलेल्या उत्तम कार्याबद्दल तसेच इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ चे राष्ट्रीय परिषदेत मिळालेल्या “बेस्ट रिसोर्स पर्सन”या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉक्टर कानिटकर यांनी त्यांच्या पुरस्कारा बद्दलची माहिती दिली तसेच कलापिनी संस्थेविषयी जुन्या आठवणीने सांगितल्या. कलापिनी संस्था ही नेहमीच कलाकारांना पूर्ण सहकार्य करून त्यांच्या कलेला वाव देत असते असे गौरवोद्गार काढले.प्रास्ताविकात कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी ‘शाळांचे मुख्याध्यापकानी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारी साठी तसेच आणि स्पर्धेतील नाटके बघण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सांगितले.
कलापिनीचे अध्यक्ष . विनायक अभ्यंकर यांनी सर्व बालकलाकारांचे त्यांच्या शिक्षकांचे आणि पालकांचे मनापासून आभार मानले आणि यशस्वी कलाकारांचे अभिनंदनही केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय कुलकर्णी यांनी केले तर मानपत्राचे वाचन संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. अंजली सहस्रबुद्धे यांनी केले.तसेच निकाल पत्राचे वाचन स्पर्धाप्रमुख श्रीयुत अशोक बकरे यांनी केले. तसेच स्पर्धा संयोजक विद्या अडसुळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार.श्रीशैल् गद्रे व कलामंडळ प्रमुख संजय मालकर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमा चा तंत्र विभाग विराज सवाई, संदीप मनवरे, प्रतीक मेहता शार्दुल गद्रे,जितेंद्र पटेल आणि त्यांचे सहकाऱ्यांनी उत्तम रीतीने सांभाळला.
स्पर्धेसाठी दिपाली जोशी, राखी भालेराव यांनी विशेष मेहनत घेतली.स्पर्धांचे निवेदन ऋचा पोंक्षे,पूजा डोळस आणि ज्योती ढमाले यांनी केले.
संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश कठाडे,नमन शिरोळकर, दीपाशू सिह,
माधवी एरंडे, विशाल जोशी यांनी सहकार्य केले.

निकाल पत्रक….
प्राथमिक विभाग
१) सांघिक प्रथम….
सरस्वती विद्यामंदिर तळेगाव…. झाडे लावा देश वाचवा .
२) भारतीय जैन संघ प्राथमिक विद्यालय पिंपरी
नाटक… मन्या.
३) डी आय सी इंग्लिश स्कूल निगडी,.. रामसेतू
उत्तेजनार्थ…..
१) कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल.. उडायला शिकायचे मला
२) आदर्श विद्यामंदिर तळेगाव… सरणार कधीतम

ग्रामीण प्रोत्साहन…
सरस्वती विद्यामंदिर इंदोरी..
प्राणाय तस्मेन नम..
संगीत…पार्श्वसंगीत …. कृष्णाराव भेगडे इंग्लिश स्कूल..
उडायला शिकायचे मला
संगीत साथ….सरस्वती विद्यामंदिर इंदोरी..प्राणाय तस्मेन नम..

लेखन प्रथम… चित्रा देशपांडे.. रामसेतू.. डी आय सी स्कूल निगडी
लेखन द्वितीय.. श्रीयुत विलास शंकर गुंजाळ.. मन्या.. भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय पिंपरी.

रंगमंच रचना… कपिला गाय…. जैन इंग्लिश स्कूल

रंगभूषा/वेशभूषा….प्रथम पक्ष्यांचे कवी संमेलन.. पैसा फंड, प्राथमिक शाळा
द्वितीय… कपिला गाय प्रधानजी शोधे उपाय… जैन इंग्लिश स्कूल.

दिग्दर्शन प्रथम.. आशा संतोष गायकवाड… झाडे जगवा देश वाचवा सरस्वती विद्यामंदिर तळेगाव.
दिग्दर्शन द्वितीय… श्रीयुत विलास शंकर गुंजाळ…
मन्या.. भारतीय जैन संघ प प्राथमिक विद्यालय पिंपरी
दिग्दर्शन तृतीय… सौ चित्रा देशपांडे… रामसेतू.. डी आय सी स्कूल निगडी.
अभिनय मुले
प्रथम… धनवीर शिवाजी बांगर..(अजय) सरणार कधीतम
द्वितीय.. स्वराज मेहत्रे (रंगा).. रामसेतू… डी आय सी स्कूल निगडी
तृतीय… तन्मय सुहास शिंदे..(सुनील) झाडे लावा देश वाचवा… सरस्वती विद्यामंदिर तळेगाव


उत्तेजनार्थ… १)प्रज्योत सत्यवान गायकवाड…(मासा) उडायला शिकायचे मला… कृष्णाराव भेगडे स्कूल
२) तन्मय दिलीप फड..(नयन) प्राणाय तस्मेन…
सरस्वती विद्यामंदिर इंदोरी

लक्षवेधी बालकलाकार…
अनय कुलकर्णी (विनय) राम सेतू.. डी आय सी निगडी
अभिनय मुली…
प्रथम.. प्रीती शा संतोष ठूबे (काळू), झाडे लावा देश वाचवा …सरस्वती विद्या मंदिर तळेगाव.
द्वितीय… श्रावणी गणेश कुलकर्णी. (खंड्या, बाबा), उडायला शिकायचे मला.. कृष्णाराव भेगडे शाळा
तृतीय… नम्रता विठ्ठल मोकाशी..(रंजना) सरणार कधीतम… आदर्श विद्यामंदिर.
उत्तेजनार्थ..१) अदिती चंद्रकांत डोंबाळे (गरुड राजा) पक्ष्यांचे कवी संमेलन.. पैसा प्राथमिक शाळा.
२) आद्या कदम..(जान्हवी) रामसेतू… डी आय सी स्कूल निगडी
लक्षवेधी कलाकार मुलगी..
पूर्वा किरण पाटील..(बाळू)
झाडे लावा देश वाचवा… सरस्वती विद्या मंदिर तळेगाव

माध्यमिक विभाग

सांघिक प्रथम…नाटक – ड्रायव्हर…रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन

सांघिक द्वितीय..नाटक – ससा कासव रिटर्न्स, जैन इंग्लिश स्कूल.

सांघिक तृतीय ..नाटक – गोष्ट मैत्रीची… ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी

उत्तेजनार्थ…
१)नाटक – भूक, कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल.
२) नाटक – वयम् मोठम खोटंम..आदर्श विद्यामंदिर
लक्षवेधी प्रयत्न सांघिक…
नाटक…आनंदी कट्टा, डी आय सी इंग्लिश स्कूल निगडी

पार्श्व संगीत… ससा कासव रिटर्न्स… जैन स्कूल.

लेखन प्रथम.. अनघा कुलकर्णी… जैन इंग्लिश स्कूल… ससा कासव रिटर्न्स
लेखन द्वितीय.. समाधान सुसर… ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी. .
गोष्ट मैत्रीची.

रंगमंच रचना… कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल…
नाटक… भूक

वेशभूषा ..१) गोष्ट मैत्रीची.. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी
वेशभूषा..२) वयम् मोठम्म खोटंम्म.. आदर्श विद्यामंदिर.
दिग्दर्शन प्रथम….राहुल जगन्नाथ जाधव.. नाटक – ड्रायव्हर, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन
दिग्दर्शन द्वितीय…अनघा कुलकर्णी.. नाटक – ससा कासव रिटर्न्स..जैन इंग्लिश स्कूल
दिग्दर्शन तृतीय…मयुरी जेजुरीकर.. नाटक – गोष्ट मैत्रीची.. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी
अभिनय मुले प्रथम.. सत्यशील नाईक… भूमिका.. यशवंत,नाटक- ड्रायव्हर..रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन
द्वितीय… श्रीमय कुलकर्णी.. भूमिका.. माकड.. नाटक..ससा कासव रिटर्न्स.. जैन इंग्लिश स्कूल
तृतीय… भार्गव पागे.. भूमिका.. झेल्या.. नाटक.. भूक.. कृष्णाराव भेगडे विद्यालय.
उत्तेजनार्थ…१) स्वागत कुंभार – वयम मोठम्म खोटॅम.. भूमिका.. जयंत.. आदर्श विद्या मंदिर
२) समर्थ बांगर. वयम् मोठम्म…. भूमिका. हेमंत आदर्श विद्यामंदिर.
लक्षवेधी बालकलाकार मुलगा.. ओम वैभव छाजेड.. भूमिका.. राजू.. नाटक.. छंद देई आनंद
पार्श्व प्रज्ञालय
लक्षवेधी बाल कलाकार मुलगी.. वैष्णवी पाटील..
भूमिका माऊली.. नाटक.. ड्रायव्हर.. रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन
अभिनय मुली
प्रथम..समृद्धी मांजर खेडे.. भूमिका.. उषा.. वयम् मोठं खोटॅम… आदर्श विद्या मंदिर.
द्वितीय.. आर्य श्री धर्माधिकारी.. भूमिका.. कमली.. आनंदी कट्टा.. डी आय सी स्कूल निगडी
तृतीय… प्राप्ती मयेकर.. भूमिका.. रमा.. ड्रायव्हर.. रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन
उत्तेजनार्थ..१) सायली कदम.. भूमिका..मुलगी.. घडलय बिघडलय.. इंद्रायणी इंग्लिश स्कूल.
२) प्रतिभा गायकवाड.. भूमिका.. माय.. नाटक. भूक.. कृष्णराव भेगडे स्कूल.
३) स्वामिनी गावडे.. भूमिका.. बो झो.. नाटक.. गोष्ट मैत्रीची.. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!