ताज्या घडामोडी

जयंत प्रीमियर कबड्डी लीगचे उदघाटन

Spread the love

प्रतिनिधी / इस्लामपूर (ता. वाळवा)

येथे जयंत स्पोर्टस् इस्लामपूर मार्फत मा. खंडेराव जाधव यांनी आयोजित केलेल्या ‘‘जयंत प्रिमीयर कबड्डी लिग 2022’’ चे उद्घाटन राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक पाटील व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते काल (ता. 24) संपन्न झाले. यावेळी राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष मा. आ. दिनकरतात्या पाटील्, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र घोडके, कार्याध्यक्ष नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष पाटील व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनाच्या सामन्यातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!