ताज्या घडामोडी

वेळ रात्री १२.१५ ची ..सुनसान रस्त्यावर ऐकटीच तरुणी.. मिळालीच नाही.

Spread the love

वेळ रात्रीची १२.१५ ची प्रयेजा सिटी परिसर जो की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला लागून आहे.. इथे एक पुल आहे त्या खाली एक १६/१७ वर्षाची युवती एकटीच उभी होती, परिसर हा सूनसान व लाईट नसलेला आहे, पिंपरी चिंचवड पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष माधव पाटील हे या रोडने येत होते. एकटीच मुलगी असल्याने मानवतेच्या दृष्टीने त्यांनी गाडी तिच्या पासून काही अंतरावर उभी केली व महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा मदत न ११२ ला फोन केला ५ मिनिटात पोलिस येतील असे त्यांना सांगितले पण १.५ तास झाले तरी मदत मिळाली नाही या १.५ तासात त्यांनी ४ वेळा पोलिस कंट्रोल रूम ला फोन केला पण पोलिस आले नाहीत मग त्यानी एक पी एस आय साहेब यांना त्यांचे पर्सनल न ला फोन केला व नंतर बीट मार्शल आले पण तो पर्यंत ती मुलगी त्या परिसरातून गेली होती. मग माधव पाटील यांनी राष्ट्रीय मानव अधिकार संघाचे पुणे जिल्ह्याचे कायदेशीर सल्लागार वकील नितिन दसवडकर यांचे शी संपर्क साधला असता आज दोघांनी सिंहगड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेब यांना भेटून रात्री घडलेला प्रकार सांगितला त्यावर माहिती घेऊन असे लक्षात आले की ११२ ला जो कॉल केला जातो तो चुकीचे लोकेशन देतो व त्या मुळे मदत वेळेत पोहचत नाही..त्यावर माधव पाटील व राष्ट्रीय मानव अधिकार संघाचे सल्लागार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असून ११२ मधील तांत्रिक अडचणी लवकर दूर करा अन्यथा ती लाईन बंद करा व १०० न चालू रहुद्या असे कळ वणार आहेत…मुलगी कोणती ही असूद्या तिचे रक्षण हा धर्म आहे व त्यासाठी आजची भेट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!