ताज्या घडामोडी

जाकादेवी प्रशालेमध्ये जागतिक महिला दिनी महिला शिक्षिकांचा सन्मान

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी येथे जागतिक महिला दिनी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्याहस्ते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षिका, महिला लिपिक व ग्रंथपाल यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका व शालेय आरोग्य विभागाच्या प्रमुख सौ. प्राची पवार यांनी महिला दिनाचे औचित्य साधून प्रमुख वक्त्याच्या भूमिकेतून बोलताना सांगितले की, महिलांची कर्तबगारी ,महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान, महिलांचे नेतृत्व आणि कर्तृत्व विशेद करून आदर्शवत महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी त्यांनी इतिहास घडविणाऱ्या स्त्रियांचा नामोल्लेख करून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. महिलांचा सन्मान घरापासूनच करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी आवर्जून नोंदवले. या कार्यक्रमात प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षिका व इतर महिला कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांच्या कार्याचे स्मरण करून जीवनात आपल्या आईची थोरवी स्पष्ट केली.
याप्रसंगी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार,सुशांत लाकडे, ज्येष्ठ शिक्षक श्री भूपाल शेंडगे ,नामदेव वाघमारे,कलाध्यापक तुकाराम दरवजकर, छायाचित्रकार मंदार रसाळ ,सौ. मनिषा धोंगडे, सौ.नेहा परकर सौ.स्नेहल माने,सौ.अस्मिता आयरे, सौ. प्राची पवार, सौ.वैष्णवी साळुंके,सौ.निलिमा कुराडे, लिपिक सौ.वैद्यही मांडवकर, ग्रंथपाल सौ. नेहा गोताड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी तर आभार भूपाल शेंडगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!