ताज्या घडामोडी

दलित महासंघाच्या वतीने महिलादिनानिमित्त पारधी महिलांना साड्या वाटप

Spread the love

दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर येथे महिलादिनानिमित्त पारधी महिलांना वाळवा पं.समितीच्या सभापती सौ.शुभांगी पाटील यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आल्या. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे प्रमुख उपस्थित होते.

सुरवातीस क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सौ.शुभांगी पाटील म्हणाल्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या पारधी समाजासाठी दलित महासंघाचा काम करण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे.पं.समितीच्या विविध योजनांचा लाभ पारधी समाजाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सौ.पाटील यांनी सांगितले.
प्रा.मधुकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्या माध्यमातून पारधी पुनर्वसनासाठी अनेक वर्षांपासून लढा चालू आहे.पारधी महिला अजूनही सर्व बाबीपासून वंचित आहेत अजूनही महिलांना त्यांचे अधिकार मिळणे गरजेचे आहे.राजमाता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले,माता रमाई यांच्या बरोबरच महापुरुषांचे विचार पारधी समाजात रुजवून नवीन पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रा.वायदंडे यांनी सांगितले.यावेळी प्रा. संजय शेवाळे, शशिकांत नांगरे, नागनाथ घाडगे, दिनकर नांगरे, इंद्रजित काळे,रचना काळे,डफळा काळे यांच्यसह महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!