ताज्या घडामोडी

जागतिक महिला दिनानिमित्त शिराळा नगरपंचायतमध्ये महिलांचा गौरव.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जागतिक महिला दिन (International Women’s Day) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते या दिवसाचे औचित्य साधून शिराळा नगरपंचायती मार्फत दिनांक 8 मार्च 2022 महिला दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शिराळा नगरपंचायत महिला आरोग्य कर्मचारी व ऑफिस महिला कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांना भेटवस्तू देणेत आली.यावेळी मा.नगराध्यक्षा यांना सर्व महिला कर्मचारी व पदाधिकारी यांना महिला दिनांच्या शुभेच्छा देवून त्यांची लाभणारी साथ अनमोल असल्याचे सांगितले. मा.मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आपल्या महिला कर्मचारी यांच्या कामाच्या पद्धती त्यांच्याकडे असणारी जबाबदारी त्या कश्या पद्धतीने पार पाडत असून त्यांचा कामाचे कौतुक केले. तसेच नगरसेविका नेहा सुर्यवंशी, राजश्री यादव तसेच नगरपंचायत कर्मचारी अर्चना गायकवाड, मुनीर लंगरदार व संजय इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमावेळी बांधकाम समिती सभापती सुजाता इंगवले, महिला बालकल्याण समिती आशाताई कांबळे, नगरसेविका सिमा कदम तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!