ताज्या घडामोडी

बामणोली परिक्षेत्रात महिला दिनानिमित्त वैधकीय शिबिर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

बामणोली परिक्षेत्रातील कारगाव नियतक्षेत्रामध्ये कारगाव, पिसाडी, कात्रेवाडी व अंबवडे या अतिदुर्गम
गावांमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरिता वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरात वैद्यकीय आधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बामणोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
सदर.शिबिरात दरम्यान उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, कॅल्शियम, किडनी व लिव्हर फंक्शन  इ. च्या चाचण्या करण्यात आल्या तसेच आवश्यकतेनुसार धनुर्वात इंजेक्शन देण्यात आली तसेच मोफत रक्त तपासण्या महालॅब अंतर्गत करण्यात आल्या,  स्त्रियांना गर्भाशय व स्तन कर्करोग टाळण्याकरिता जनजागृती व
पुरुषांना तोंडाचा कर्करोग टाळण्याकरिता व्यसने प्रतिबंध विषयी जनजागृती  करण्यात आली व आवश्यकतेनुसार
औषधांचे वाटप करण्यात आले. सदर
कॅंपदरम्यान एकुण तीस स्त्रिया, पंधरा
पुरुषांची तपासणी करण्यात आली तर
तेवीस व्यक्तींची रक्त चाचणी करण्यात
आली. तसेच सदर कॅंपवेळी पिसाडी, अंबवडे व कात्रेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक व ग्रामसेवक कारगाव उपस्थित होते, त्यांचे देखील शाळेमधे विद्यार्थ्यांकरिता करता येऊ शकणार्या
उपक्रमांविषयी चर्चा झाली. सदर गावे
अतिदुर्गम क्षेत्रात असून येथे दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत.
त्यामुळे या वैद्यकीय शिबिर यशस्वी होणे साठी प्राथमिक वैदयकीय चाचणी होण्यास मदत झाली. बामणोली परिक्षेत्रातील दुर्गम भागात अश्या प्रकारची वैद्यकीय शिबीरे आयोजित करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यानी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!