आरोग्य व शिक्षण

महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने मुंबईत आंदोलन

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने काल मंगळवार दि.8 मार्च रोजी गोड्या पाण्यातील मच्छिमार सहकारी संस्थां व मच्छिमार बांधव यांच्या उपस्थितीत आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास कसल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही.या आंदोलनासाठी जवळपास दीड ते दोन हजार मच्छिमार बांधव उपस्थित होते. आंदोलना दरम्यान मंत्रीमहोदयानी शिष्टमंडळास भेटण्यास बोलावले.त्या बैठकित मंत्री महोदयांनी संघटनेने केलेल्या मागणीबाबत पुढील प्रमाणे आश्वासन दिले.

1) तलाव ठेका मुदतवाढ दि.9 मार्च रोजी आदेश निर्गमित होणार
2) तलाव ठेका माफी बाबत प्रस्ताव कँबेनेटला सादर करून तलाव ठेका माफी मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
3) 3 जुलै 2019 शासन धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही
4) गोड्या पाण्यातील शासन धोरणा वर राज्यातील सर्व संस्थांना व मच्छिमार यांच्याशी सर्वसहमतीने कायदा तयार करणार
5) प दु म सचिव व आयुक्त मच्छिमारांन विरोधात काम करत असल्याने त्यांची हाकलपटी करणार.
6) मत्स्यउद्योग महामंडळाकडील जलाशयांबाबत मच्छिमार सहकारी संस्थांनशी बैठक घेऊन मच्छिमार संस्थांना न्याय देणार.
7) अतिवृष्टी मधील नुकसान भरपाई मिळण्यासाठी जी एस टी ची अट शिथिल करणार
8) राज्यातील मच्छिमारांच्या प्रत्येक जिल्ह्यातील अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा निहाय मिंटिंग घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यात येथील.
9) संघटनेने केलेल्या 15 मागण्यांपैकी वरील अटींसहित राहिलेल्या मागण्यांबाबत बैठक घेऊन त्यावर मच्छिमार हिताचे निर्णय घेण्याचे शिष्टमंडळ भेटीत मंत्रीमहोदय अस्लम शेख साहेबांनी सुचित केले.

राज्यातील सहकारी संस्था व मच्छिमारांच्या बाबत हि बाब दिलासादायक असल्याने आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व मच्छिमार बांधवांचे महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!