ताज्या घडामोडी

मालती कन्या महाविद्यालयामध्ये हस्तकला कौशल्य प्रशिक्षण व लघुउद्योग कार्यशाळा संपन्न

Spread the love

इस्लामपूर वार्ताहर :

मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून गृहशास्त्र व मराठी विभागाने अग्रणी महाविद्यालय कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांचा विकास, सृजनशीलतेचा विकास होऊन आत्मनिर्भर व सक्षम बनवण्यासाठी “हस्तकला कौशल्य प्रशिक्षण व लघु उद्योग कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी सौ. पुनम साटम (समृद्धी फूड्स, इस्लामपूर) व कु. आकांक्षा जाधव यांनी मार्गदर्शन केले. “विद्यार्थीनींनी आपली स्वतःची आवड, क्षमता ,कौशल्य ओळखणे महत्त्वाचे आहे तरच आपण व्यवसायाकडे वळू शकतो.”असे प्रतिपादन सौ. पुनम साटम यांनी केले. त्याच बरोबर वेगवेगळ्या आकाराचे दिवे, पणत्या ,तुळस ,आरतीचे ताट, रुखवताचे ताट ,संक्रांतीचे खण सजवण्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. कु.आकांक्षा जाधव यांनी गणपती- गौरी सजावट व फेटे ,मूर्तीची अंगवस्त्रे यांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर यांनी आपल्या मनोगतात’ विद्यार्थीनींनी फावल्या वेळेचा सदुपयोग करून घरगुती छोटे व्यवसाय सुरू करून अर्थार्जन करावे’ असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी केले. सौ. निकी राहुल पोरवाल व महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. प्रोफेसर डॉ. शीला रत्नाकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले .यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!