ताज्या घडामोडी

प्रा.खानोलकर “द व्हाईस आँफ सिधुदुर्ग” .. सिनेतारका किशोरी अंबियेचे गौरोद्गार!

Spread the love

खानोली गावचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या अभ्यासपुर्ण सुत्रसंचालनातुन रत्नागिरीवासियांची मने जिंकली,शिव मल्हार सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात सिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी ही प्रा.वैभव खानोलकर यांच्या अभ्यासपुर्ण निवेदनाने भारावुन गेल्या आणि” द व्हाईस आँफ सिंधुदुर्ग” म्हणुन गौरोद्गार काढत शाल,श्रीफळ,भेटवस्तु देऊन प्रा.वैभव खानोलकर यांचा विशेष सत्कार केला.

सिनेतारका किशोरी अंबिये याच्या हस्ते करण्यात आला.प्रा.खानोलकर हे नेमळे पंचक्रोशी विद्यालय नेमळे,सावंतवाडी आणि न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करतात.
दशावताराचे युवा अभ्यासक, दशावतार कलावंताच्या मुलाखती,युवाव्याख्याते, विविध विषयावर लेखन आणि सुप्रसिद्ध निवेदक म्हणुन ते परिचित आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातुन त्यांनी या पुर्वी डाँ.प्रकाश आमटे,पद्मश्री सिधुताई सपकाळ, सिनेतारका वर्षा उसगावकर निवेदिका समिरा गुजर, आमदार निलेश राणे,गोव्याचे कामगार नेते अँड.राणे,खासदार संजय राऊत,अभिनेता माधव अभ्यंकर,अरुण नलावडे, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोंविद तावडे,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे समाजसेविका तृप्ती देसाई सह अँड प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचे अभ्यासपुर्ण निवेदन करताना त्यांनी अनेकांच्या मनाचा वेध घेत शाबसकी मिळवली.
आपल्या अभ्यासपुर्ण निवेदनातुन राज्यस्तरावर सिंधुदुर्गाचे नाव झळकवणा-या “द व्हाईस आँफ सिधुदुर्ग प्रा.खानोलकर” यांच्यावर राज्यस्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
आपल्याला मिळालेले यश हे केवळ आपले नसुन माझ्या खानोली गावासह माझ्या शाळेतील संस्था चालक,व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक,प्राचार्या सह माझे शिक्षक सहकारी ,मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वासह सिधुदुर्गवासियांचे हि आहे अशा भावना प्रा.वैभव खानोलकर यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!