ताज्या घडामोडी

आर. आर. एंटरप्राइजेस वि सद्गुरू एंटरप्राइजेस व गंधेकर एलेक्ट्रिकल्स वि शिवांश एंटरप्राइजेस उपांत्य फेरीत लढणार

Spread the love

अमरहिंद मंडळ आयोजित व्यावसायिक पुरुष ‘अ’ गट कबड्डी स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई १३ मार्च (क्री. प्र.), अमर हिंद मंडळाने अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘अ’ गट पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन अमर वाडी, गोखले रोड, दादर (प.), मुंबई येथे केले आहे. आज झालेल्या सामन्यात गंधेकर एलेक्ट्रिकल्सने सचिवालय जिमखान्याला, आर. आर. एंटरप्राइजेसने पी. डी. हिंदुजाला, व शिवांश एंटरप्राइजेसने मुंबई पोष्टाला पराभूत करून उपांत्य फेरीतील आपापले स्थान पक्के केल.

उपउपांत्य फेरीच्या सामन्यात गंधेकर एलेक्ट्रिकल्सने सचिवालय जिमखान्यावर ३८-२५ असा १३ गुणांनी मोठा विजय साजरा केला. या सामन्यात गंधेकरच्या दिप थरवळने चौफेर चढाई करत त्यांच्या संघाची विजयश्री निश्चित केली. त्याला उत्कृष्ट साथ देताना कल्पेश कडूने जोरदार पकड केल्या. तर सचिवालयाच्या कल्पेश जाधव व गणेश भोईरने जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहचवू शकले नाहीत.

दुसर्‍या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात आर. आर. एंटरप्राइजेसने पी. डी. हिंदुजाला ४३-३१ अशी १२ गुणांनी धूळ चारली. या सामन्यात आर. आर.च्या अनिकेत भेलसेकर ओमकार ढवळे यांनी अनुक्रमे पकड व चढाईत चमकदार कामगिरी नोंदवत विजय साकारला. तर पराभूत हिंदुजाच्या धनंजय सरोजने कडवी लढत दिली मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

तिसर्‍या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात शिवांश एंटरप्राइजेसने मुंबई पोष्टावर ३९-२२ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिवांशच्या शिवम पवारने चढाईत कमालीची कामगिरी पार पाडली व आकाश बर्गेने अतिशय छान पकड करत मुंबई पोष्टाला डोक वर काढण्याची संधी दिली नाही. तर पराभूत मुंबई पोष्टाच्या शुभम चौगुलेने चांगला खेळ केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!