ताज्या घडामोडी

पाच राज्यातील निवडणुकांच्या निकाला वरून सगळे संपले असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला आहे-ना.जयंत पाटील

Spread the love

इस्लामपूर दि.१३ प्रतिनिधी
पाच राज्यातील निवडणुकांच्या निकाला वरून सगळे संपले असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत बसपा आणि एमआयएमच्या उमेदवारांनी काही मते खाल्ल्याने समाजवादी पक्षाच्या अनेक जागा दोनशे ते दोन हजारच्या फरकाने पडल्या. अन्यथा वेगळे चित्र दिसले असते,असे भाष्य राज्याचे जलसंपदामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी नेर्ले येथील समारं भात बोलताना केले. जो आमचा आहे,तो आमच्या पक्षाचेच काम करेल. जो करणार नाही,त्याच्यावर आता पांघरून न घालता फुली मारू,असा इशाराही त्यांनी दिला. आता मॉडेल स्कुलनंतर जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील आरोग्याची सेवा अद्यावत करू,अशी घोषणाही त्यांनी केली.
नेर्ले येथे ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर,आ. मानसिंग भाऊ नाईक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा परिषद सदस्या संगिता पाटील, सभापती सौ.शुभांगी पाटील, महिला राष्ट्रवादी च्या जिल्हाध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव,संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष संजय पाटील,कृष्णेचे संचालक संभाजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ.एस.व्ही.पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ना.पाटील पुढे म्हणाले,पेट्रोल,डिझेल,गॅस दर वाढ,महागाईने सामान्य जनता हैराण आहे. शेतकरी आंदोलन,लखीमपूर शेतकरी हत्या आदी अनेक प्रश्न आहेत. अखिलेश यादव,प्रियांका गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता हा निकाल अनपेक्षित आहे. आम्ही जनतेला लोकोपयोगी कामे,तसेच
पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण सध्या शाळेतच जातीचे दाखले देत आहोत. आतापर्यंत ८ हजार दाखले दिले आहेत आता शाळेतच जात पडताळणी दाखले देण्याची व्यवस्था केली आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या पक्ष प्रवेशाने जिल्ह्यात आमच्या पक्षास बळकटी मिळेल.
ना.मुश्रीफ म्हणाले,राज्य शासनाने नियमित कर्जदारांना ५० लाख अनुदान जाहीर केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात नियमित कर्जदारांची संख्या जास्त असल्याने आपणास त्याचा चांगला फायदा होवू शकतो. राज्या तील ११ कोटी जनतेपैकी साडेचार कोटी लोक हे कामगार आहेत. यातील ८० लाख संघटीत आहेत. उर्वरित ४ कोटी कामगारांच्या जीवनात परिवर्तन,क्रांती घडवून आणणार आहोत. स्व.राजारामबापू पाटील यांनी घालून दिलेला आदर्श ना.जयंतराव पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत.
सौ.रुपाली चाकणकर म्हणाल्या,पाणी हा आमच्या महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. साहेबांनी ११ गावातील पाणी योजना मार्गी लावून महिलांना मदतच केली आहे. आमच्या परिवार संवाद यात्रेत लोक रात्री १-१,२-२ वाजेपर्यंत साहेबांची वाट पहात होते. राज्यातील पाण्याचा प्रश्न तेच सोडवू शकतात, हा विश्वास राज्यातील जनतेत निर्माण झाला आहे. राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थ संकल्पातही महिलांच्या साठी अनेक योजना धरल्या आहेत.
आ.मानसिंगभाऊ नाईक म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांनी आपल्या गावासह ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेस ११ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. काही कामे झाली,उर्वरित लवकरच पूर्ण होतील. वाकुर्डे योजनेस पूर्वी फक्त ८० कोटींचा निधी मिळाला. मात्र साहेबांनी या योजनेस तीन वेळा ३०० कोटींचा निधी दिल्याने या योजनेस मोठी चालना मिळाली आहे. तुम्ही सांगाल, त्या कामास गती देवू. गावातील वाद बाजूला ठेवून पक्षाची,साहेबांची ताकद वाढवा.
यावेळी संजय पाटील,संभाजी पाटील यांनी,स्व.बापूंनी ५० वर्षांपूर्वी गावाला नळ पाणी पुरवठा योजना दिली होती. मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होती. साहेबांनी पुन्हा आमच्यासह ११ गावांना अद्यावत पिण्याच्या पाण्याची योजना दिली असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी योजनेचा सविस्तर आढावा मांडला.
प्रारंभी सरपंच छायाताई रोकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, प्रांताधिका री डॉ.संपतराव खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख,महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम,जेष्ठ नेते आप्पा साहेब माने,सुभाषराव पाटील,सर्जेराव पाटील,दिलीपराव पाटील,विलासराव पाटील,डी.आर.पाटील,दिनकर मोकाशी, अनिल साळुंखे,शुभम पाटील यांच्या गावा तील पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,नळ पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच विश्वास पाटील यांनी आभार मानले. गोपाळ पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!