ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठाची कृषीदर्शनी म्हणजे आधुनिक ज्ञानेश्वरी

Spread the love

नेवासा महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषी दर्शनीप्रकाशित केली आहेया कृषीदर्शनी चे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टीकतृणधान्य प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी दर्शनी चे मोफत वाटप कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक राव ढगे यांच्या हस्ते करण्यात आलेनेवासा तालुक्यातील धनगर वाडी येथे कृषी सहाय्यक श्रीमती मंदाकिनी दहातोंडे यांनी शेतकरी गट स्थापन केला आहे या शेतकरी गटामार्फत कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेअध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य योगेश वाल्हेकर होते

याप्रसंगी डॉढगे म्हणाले की कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करूनविविध पिकावर आधुनिक तंत्रज्ञान तयार केले आहे त्याची सर्व सविस्तर माहिती कृषीदर्शनी मध्ये दिली आहे शेतकऱ्यांनी कृषी दर्शनी मनोभावे वाचून तिच्या ज्ञानाचा उपयोग शेतीमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी करावा कारण सर्व पिकांची इतंभूत माहिती आधुनिक तंत्रज्ञान यावर या डायरी मध्ये वापर करण्यात आला आहे प्राप्त स्थितीमध्ये अनेक शेतकरी सुशिक्षित व तरुण आहेत त्यांनी याचे वाचन केल्यास निश्चितच त्यांना फायदा होईल याप्रसंगी शेतकऱ्यांनी विविध प्रात्यक्षिक प्रयोगांनाभेटी दिल्या गटाचे अध्यक्ष अशोक वाल्लेकर सचिव सूनील वाल्हेकरगंगाराम भागवत बाबुराव वालेकर दीपक वाल्लेकर जगन्नाथ वाल्लेकरजगदीश चौधरी टरबूज व केळी पिके योगेश शिंदे पपई बाबासाहेब काळे सुभाष तनपुरे भाजीपालाभरत कारले केळी या शेतकऱ्यांच्या शेतावर उत्तम प्रकारची पिके असल्यामुळे त्यांचे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक राव ढगे यांनी कौतुक केले कृष्णकांत ससे यांनी सर्वांचे आभार मानले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!