ताज्या घडामोडी

लोटे हाय स्कूलमध्ये 10 वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Spread the love

प्रतिनिधी
जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे मध्ये 10 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री राजू भाई रेडीज,उपाध्यक्ष श्री. बाबू घाग , संस्थेचे सचिव वारनकर सर संचालक श्री. संदीप घाग, श्री अनंत घाग प्रमुख पाहुणे विनती कंपनी चे प्रतिनिधी श्री. सचिन खरे साहेब, रॅलीज कंपनी चे प्रतिनिधी श्री. दीपक जाधव, मुख्याध्यापक श्री. बसवंत सर उपस्थित होते.
प्रथम कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गीताने झाली. आलेल्या पाहुण्यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मा.अध्यक्ष व संचालक यांनी सरस्वतीचे पूजन केले अध्यक्ष निवड श्री. चव्हाण सर यांनी उपाध्यक्ष श्री बाबू घाग यांची निवड करण्यात आली अनुमोदन श्री. अनिल जाधव यांनी दिले.
9 वी च्या विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेत यश मिळावे म्हणून शुभेच्छा दिल्या तसेच 10 वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा निकाल 100 % लाऊ विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी जाग्या केल्या .शाळेस स्पिकर बॉक्स 02 व माईक ,स्टँड डाइस भेट दिले. श्री. खरे साहेब श्री .दीपक जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. मोरे मॅडम यांनी डॉक्टर लहाने यांचा वास्तव जिवन प्रवासात गरिबीची जाणीव व अभ्यास कसा करावा याचे उत्तम उदाहरण दिले.
संस्थेचे सचिव श्री. वारनकर सर यांनी टी.व्ही ,मोबाईल पासून या कालावधीत दूर राहा खूप अभ्यास करून मार्क्स चांगले मिळवा. मोठे अधिकारी व्हा शाळेस विसरू नका .या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते 9 वी अ ब क यांनी नियोजन केले होते सर्वांना अल्पोपाहार देण्यात आला
आभार श्री. कुळे सर यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!