ताज्या घडामोडी

एका अकल्पनिय क्षणाचे साक्षीदार

Spread the love

होय काळ रात्री आम्ही ठरलो एका अकल्पनिय क्षणाचे साक्षीदार. काल सावंतवाडी,सिंधुदुर्गच्या क्षितिज इव्हेंट सावंतवाडी या संस्थेचं नाटक होतं कै. वसंत कानिटकर लिखित अजरामर नाट्यकृती संगीत मत्स्यगंधा. नाटक चालू होतं आज नाटकाला जायचं नजायच करत करत आम्ही नाट्यगृहात पोहोचलो. नाटक बरोबर वेळेत सुरू झालं आम्ही रोजच्या सारख्या सर्व नियमिय येणाऱ्या रसिक आणि रंगकर्मी अश्या सर्वांचाच खूप सुंदर अश्या स्मितानी स्वागत केलं.

आणि रसिक म्हणून प्रेक्षागृहात स्थानापन्न झालो. नाटक सुरू झालं आणि एका निर्धारित गतीनं पुढं पुढं जात राहीलं परक्षरांची सगळी गाणी झाली अंक पहिला पडला,दुसऱ्या अंकाची सुरवात झाली भीष्मांचे संवाद झाले आणि आणि अंक संपलाही. आणि अगदी पाचच मिनिटात रंगमंचा मागे कसली तरी धावपळ सुरू असल्याचे जाणवले आम्ही प्रेक्षागृहातून बँकस्टेज ला आलो तर समजले की असह्य उकाडा आणि रंगमंचावरील प्रखर लाईट्स यांच्या गरम्यामुळ्ये भीष्मांची भूमिका करत असलेले खुद्द बाळ पुराणिक यांची तब्येत खूप खराब झाल्याचे समजले.प्रेक्षागृहात असलेल्या डॉ. श्रीम.जोशी यांनी त्यांना तपासले प्रथम तपासणी नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे असे सांगितले आणि तातडीने खलवायन रत्नागिरी चे अध्यक्ष आदरणीय मनोहर जोशी यांनी हॉस्पिटल मध्ये संपर्क साधून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आलं देखील. तोपर्यंत संघ प्रमुखांनी परिक्षकांशी संपर्क साधून तिसरा अंक शंतनूचे पात्र साकारणाऱ्या रंगकर्मीनी पुस्तक पाहून वाचन करावे आणि बाकीच्यांनी अभिनय करून तिसरा अंक पूर्ण करावा असे ठरले.त्याच वेळी रत्नागिरीचे गायक नट श्री अभयजी मुळ्ये यांनी सावंतवाडीच्या संघातील प्रमुखांशी चर्चा केली आणि सांगितले की प्रेक्षागृहात श्री. नितीन जोशी उपस्थित आहेत ज्यांनी या पूर्वी उत्तम भीष्म साकारला आहे त्यांना विचारुया. त्यांनी नितीन जोशी यांना रंगपटात बोलावून आपण भूमिका कराल का? असे विचारताक्षणी नितीनजी यांनी त्वरित होकार दिला आणि शो मस्ट गो ऑन चा खरा खुरा प्रत्यय आणून दिला.खरंतर आज चौदा तारखेला होणारे सावंतवाडीच्या संघाचे मत्स्यगंधा नाटकच १६ तारखेला नितीन जोशींच्या दिग्दर्शनाखाली कालारंग नाट्यप्रतिष्ठान वरवावडे खंडाळा ही संस्था स्पर्धेत साकारणार आहे. पण नाटक घडलं पाहिजे नाटक जंगल पाहिजे अश्या सुक्या गप्पा आणि चर्चासत्र रंगविण्यापेक्षा आपल्या कृतीतून हे घडविण्यावर विश्वास असणाऱ्या नितीन जोशींनी तिसऱ्या अंकातील भीष्म साकारला. आणि तोही इयका उबेहुब आणि बेमालूम की हे एक पात्र या संघातील नाही हे जर अंबेसोबतच्या प्रवेशादरम्यान सांगितले असते तर ते कुणाला खरे देखील वाटले नसते. आणि हे उभे करण्यासाठी मध्ये अवधी किती तर उणीपुरी २० मिनिटे नितीनजींनी त्यांच्या उत्तम नाट्यजाणिवेचे काल दर्शनच घडविले. भारदस्त पदन्यास आणि कसलेल्या आवाजातील तितकीच भारदस्त संवादफेक ही नितीनजींची खासियत काल त्या त्या कमी अवढीतही नाटकाच्या सादरीकरणाला सावरून गेली किंबहुना तारून गेली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नाटक सादर झालं प्रयोग पूर्ण झाला आणि कधीही पाहिली नाही अशी घटना घडली ती म्हणजे परिक्षाकांच्या वतीने सन्माननीय परीक्षक श्री. मुकुंद मराठे सर पडदा पडल्यावर आत गेले आणि लगेच पडदा पुन्हा उघडायला सांगून त्यांनी सयूंक्त नाटकांचा उल्लेख करत श्री. नितीनजी जोशी यांचं मनापासून अभिनंदन केलं. खरं तर परीक्षकांना असे करण्याची गरजच नव्हती तरीही ते घडलं अगदी आपसूक आणि कुणाच्याही नकळत. यामागचं कारण सांगायचं शोधायचं झालं तरी ते सापडतं कानिटकरांच्या याच संहितेमध्ये की आदर्श जीवांमुल्यांचा उच्चार आणि प्रसार घडविला जातो तो याच संगीत नाटकांतून आणि परंपरातून. भीष्म म्हणतात *भीष्माचं वर्तन धर्माच्या चौकटीत बसणारं नसेल तर दरमाची चौकट बदलेल पण भीष्म बदलणार नाही. घेतल्या प्रतिज्ञेचा भंग करणार नाही* नेमकं हेच झालं काल भीष्म बदलला नाही. बदलली ती धर्माची चौकट. आणि म्हणूनच परिक्षकांनीही याचं खूप खुप कौतुक केलं. आणि का होऊ नये कुणी फुटबॉल पट्टू मैदानावर पडला तर त्याला उचलणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला स्पोर्ट्स स्पिरितच्या विशेषणाने अखंड जगाने फिफा वर्ल्डकप च्या वेळी गौरविण्यात आलं हेही अगदी तसंच आहे.आपलाच संघ स्पर्धेत असणारा दिग्दर्शक दुसऱ्या संघाच्या सादरीकरणासाठी उभा राहिला यापेक्षा सुदृढ स्पर्धा दुसरी कोणती.

बरं त्यामागे कुठल्याही शाब्बासकीची लालसा नाही की काही नाही नितीन जोशींनी भीष्म साकारला त्याला आठ वर्ष होऊन गेली. याच नाटकाचे त्यांनी आठ वर्षांपूर्वी १० प्रयोग केलेत आणि त्यांनीच भीष्म करावा यासाठी पुर्णतः भीष्मांच्याच आयुष्यावर मी लिहिलेलं *कुरुमणी* हे नाटकही नितीनजींनी दिगदर्शीत केलय आणि त्यातील भीष्मांच्या भूमिकेकरिता रौप्य पदकही मिळवलं आहे. तेव्हा या व्यक्तिरेखेकडून नवी अशी त्यांची अपेक्षा काय असणार.पण एखाद्या पौराणीक व्यक्तिरेखेचा समाज जीवनावर कसा प्रभाव बनतो याचं दर्शन काल घडलं.
*कुरुमणीचं* समीक्षण करणाऱ्या श्रीम. संध्याताई सुर्वे यांनी लिहिलेलं शीर्षक होतं भीष्मराज भीष्मराजांसारखेच वाटले. काल त्या देखील प्रेक्षागृहात उपस्थित होत्या काळाचा एकूण प्रसंग पहाता आता त्यांना असं म्हणावं लागेल की *भीष्माराज भीष्मराजांसारखेच वागले.*
थांबतो काल आजारी झालेल्या श्री. बाळ पुराणिक यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होउदे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि कालारंग नाट्यप्रतिष्ठान च्या दिनांक १६ रोजी होणाऱ्या नाट्यप्रयोगाकरिता खूप साऱ्या शुभेच्छा देखील देतो.

धन्यवाद
अमेय धोपटकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!