राजकीय

आमदार कोरे यांचे वजन कदम यांच्या पारड्यात…..

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर) 

कोल्हापूर विधानसभेच्या पोट पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे सत्यजित कदम यांच्या नावासाठी आमदार विनय कोरे अग्रही असल्याचे समजते. यामुळे भाजपची उमेदवारी जाहीर होणार होती, परंतु ती अद्यापही जाहीर झालेली नाही. भाजपाने तीन दिवसांपूर्वी दोन दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या आणि जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाली आहे. आमदार कोरे कदमांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी तशी फिल्डिंग लावली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध असल्याने कोरे यांना भाजपाच्या गोटात महत्त्वाचे स्थान आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचा दबदबा आहे. कोल्हापूर शहरातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते प्राध्यापक जयंत पाटील यांनी कदम यांची बाजू उचलून धरल्याने आमदार कोरे यांचे मत त्यांच्याच बाजूने झूकले आहे. भाजपाचे नेते अमित शहा कोल्हापूरचे जावई असून त्यांच्या निर्णयावर कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोट निवडणुकीची भाजपाचे उमेदवार अवलंबून आहे. त्यातच अमित शहा व आमदार विनय कोरे यांचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याने कोरे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. महेश जाधव यांना 40 टक्के तर कदम यांना 60 टक्के नेत्यांचे पाठबळ असल्याने भाजपची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. भाजपाला कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जागा जिंकायची आहे. त्या दृष्टीने भाजपाने वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तीन पक्ष्यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. हाच प्रमुख मुद्दा शिवसेने पुढे आहे. मातोश्री तुन काय निर्णय येतोय याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, अभी नही तो कभी नही, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची निवडणूक लढवायची हा इराधा शिवसेना कार्यकर्त्यांनी बांधा आहे. काँग्रेसतर्फे जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांना सहानुभुतीचा फायदा होईल, अशी अटकळ काँग्रेस नेत्यांना आहे. परंतु एक महिला उमेदवार कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आपले आव्हान उभे करू शकणार नाही, असा अंदाज भाजपाने बांधला आहे. यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काही झाले तरी कोल्हापूरची जागा जिंकायचीच असा निर्धार भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे सुरुवातीला एकतर्फे होईल, अशी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीने होईल, असे संकेत मिळत आहेत. शिवसेनेला उमेदवारी मिळो अगर न मिळो पण शिवसेना काँग्रेसला सहकार्य करणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेचे राजकीय सूत जुळले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते माताचा कट्टा भाजपाच्या पारड्यात ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल फिरू शकतो. परंतु शिवसेनेची मते फुटू नयेत यासाठी मातोश्री वरून दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी पक्षाने दबाव आणला तरी कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाला जुमानत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर भाजपाला या निवडणुकीत यश आले तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांना अधिक महत्त्व येणार आहे. तसे झाले तर दिल्ली दरबारी त्यांचे वजन वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!