ताज्या घडामोडी

मल्हार क्रांती सेवा संस्थेच्या वतीने काराजनगी येथे शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती

Spread the love

जत प्रतिनिधी
आज मल्हार क्रांती सेवा संस्थेच्या वतीने काराजनगी या गावी सांगली जिल्हाध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने व तालुका अध्यक्षा संगिताताई लेंगरे यांच्या उपस्थितीत शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती व अन्यायाविरुद्ध संघर्ष कसा करायचा याबाबत माहिती व जिल्हाध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विधवा पेंशन योजना. अपंग पेन्शन योजना व महाराष्ट्रा शासन यांचेवतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व महिलांना देण्यात आली. डिजिटल इंडिया करायला चाललेल्या सरकारला लाज वाटली पाहिजे अजुनही काराजनगी सारख्या छोट्या गावात म्हणजेच माने वस्तीवरती गेली एक महिना झाले लाईटची सोय नाही तिथील शेतकरी बांधव साप. विंचु. आणि काटया कुटयामधये जीवन जगत आहे. जर माने वस्तीवरील शेतकरी बांधवांच्या जीवास बरे वाईट झाल्यास महावितरण चे जत तालुक्यातील सर्व अधिकारी जाबाबदार राहतील शेतकर्यांच्या जिवाचे बरे वाईट होण्याच्या अगोदर महावितरण चया जत तालुक्यातील अधिकाऱ्यांनी माने वस्तीवरील लाईट चालु करावी अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना घेऊन महावितरण ऑफीसला टाळे ठोकण्यात येतील असा निर्वाणीचा ईशारा मल्हार क्रांती सेवा संस्थेच्या वतीने देत आहोत. यावेळी गावातील पोलीस पाटील. ग्रामपंचायत सदस्य व 100 महिला उपस्थित होत्या. जिल्हाध्यक्ष सुखदेव काळे. जिल्हाध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने. शिवसवराजय संस्थेचे मुन्नाभाई शेख. प्रदेश अध्यक्ष तानाजी व्हनमाने यांनी मार्गदर्शन केले महेंद्र हांडे यांचेही सहकार्य लाभले
आभार..जत तालुका अध्यक्षा संगिताताई लेंगरे यांनी मानले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!