आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

डोक्यात बीअरची बाटली फोडून साते गावात एकाचा खून

Spread the love

साते : डोक्यात बीअरची बाटली फोडून साते गावात माथाडी मुकादमाचा अज्ञात इसमांनी खून केल्याची घटना बुधवारी (दि. 16) रोजी रात्री पावणे दहा वाजता  पवनाना बंदीस्त जलवाहिनीच्या जवळ बो-हाडे वस्ती समोर घडली.

ज्ञानोबा पांडुरंग मुजूमळे (वय 55 रा. कोंडणपूर, ता. हवेली,पुणे )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ज्ञानोबा मुजमुळे यांच्या डोक्‍यात बीअरची बाटली  काही अज्ञात इसमांनी फोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे विकास सस्ते, कर्मचारी मनोज कदम, श्रीशैल कंटोळी, भाऊसाहेब खाडे आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील तळपेवडी येथे महिलेचा शेतीच्या वादातून चुलत भावाने खून केला.या घटनेतील आरोपी पोलीस कोठडीत असतानाच बुधवारी रात्री खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!