आरोग्य व शिक्षण

12 ते 14 वयोगटासाठी पहिला डोस व 60 वर्षापुढील सर्वांसाठी बूस्टर डोस देण्याचे अभियान सूरु

Spread the love

मावळ : केंद्र शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 16 मार्च पासुन CORBEVAX लस 12 ते 14 या वयोगटातील म्हणजेच 2008,2009,2010 या वर्षात जन्म असलेल्या सर्व बालकांसाठी तसेच COVISHIELD/COVAXIN 60 वर्षापुढील सर्वांसाठी बुस्टर/तिसऱ्या डोसचे लसीकरण सूरु होत आहे.

12 ते 14 वयोगटातील सुमारे 5204 इतके उद्दिष्ट लसीकरणासाठी आहे. 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याचे/ लाभार्थ्याचे लसीकरण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष शाळेत जाऊनच सूरु करण्यात आले आहे. शाळानिहाय कृती आराखडा बनवून लस उपलब्धतेनुसार पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल याबाबत आरोग्य विभागाने संपूर्ण नियोजन केलेले आहे.

12 ते 14 वयोगटातील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे तसेच पालकांनी देखील मुलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.60 वर्षावरील सर्व व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभाग मावळ तर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!