ताज्या घडामोडी

खोतवाडी येथे हरीनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव सम्पन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
खोतवाडी (सोनवडे) या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गेली पन्नास वर्ष अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा घेऊन पंचक्रोशीमध्ये एक आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
खोतवाडी (सोनवडे) ता.शिराळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सदिच्छा भेटी प्रसंगी शिवाजीराव नाईक बोलत होते. तर माजी पंचायत समिती सभापती एन डी लोहार, यशवंत दूध संचालक प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाईक पुढे म्हणाले, शिराळाच्या पश्चिम भागामध्ये डोंगर-दर्‍यांमधे वसलेले खोतवाडी (सोनवडे )या गावाने सलग पन्नास वर्षे श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याची आयोजन करून तालुक्यांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. सोनवडे गावाचा एक छोटासा वार्ड असणाऱ्या खोतवाडी गावातील ग्रामस्थांनी भक्तीभावाने एकत्रित येऊन पारायण सोहळा अगदी चांगल्या पद्धतीने राबवून गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. सुवर्णमहोत्सव मंडळातील पदाधिकारी व प्रमुखांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत या पुढील काळातही गावामध्ये असेच गुण्यागोविंदाने राहावे व पारायण सोहळा असाच अखंडपणे चालावा अशा शुभेच्छा नाईक यांनी दिल्या . यावेळी शंकर (दादा) मोहिते ,यशवंत खोत, शिवाजी खोत, आनंद कंधारे, बाबुराव खोत,तुकाराम खोत, एकनाथ महाराज , दिलीप खोत , पोपट मोहिते, विष्णू राने, आनंद मस्कर, नथुराम मोहिते , अशोक राणे, दिपक मस्कर , ज्ञानदेव खोत ,संतोष खोत, धनंजय राने, रामचंद्र खोत ,बबलू शेळके, भगवान मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!