आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जायंट्स गृप ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित रक्तदान व अवयवदान शिबिर संपन्न

Spread the love

जायंट्स गृप ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित रक्तदान व अवयवदान शिबिर संपन्न

आवाज न्यूज  तळेगाव दाभाडे: जागतिक रक्तदाता दिवस 14 जून आणि कै. पद्मश्री नाना चुडासमा यांच्या जयं

तीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे, जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी तसेच यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत आज दिनांक 19 जुलै रोजी यशवंत नगर शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना संस्थेच्या सर्व सभासदांनी तसेच तळेगावकरांनी या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच संस्थेने अवयवदानाचे महत्त्व सांगत 15 नागरिकां तर्फे अवयव दानासाठी प्रतिज्ञापत्र भरून संकल्प केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुढारी वृत्तपत्र समूहाचे पत्रकार  जगन्नाथ काळे आणि आवाज वृत्तवाहिनीचे श्री राजेश बारणे यांच्या मार्फत दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.

जायंट्स ग्रुप तर्फे अ‍ॅड. देविदास टिळे, संदीप गोंदेगावे,  रमजान मुल्ला, सुनील साखरे,

दीपक पंडित,  सुमित पारखी,. सुप्रिया पारखी,  तस्मैया मुल्ला या सभासदांनी शिबिराचे काम पाहिले.
पिंपरी चिंचवड रक्तपेढी तर्फे शरयु वराज बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!