ताज्या घडामोडी

दीनदयाळ सूतगिरणीत अत्याधुनिक स्पिड फ्रेम मशिनरी कार्यान्वित

Spread the love

महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री , दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे लि .. इस्लामपूर चे संस्थापक , मार्गदर्शक मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि , इस्लामपूर येथे इटली येथील मार्जोली कंपनीच्या २२४ स्पिडल्स असलेल्या अत्याधुनिक स्पिड फ्रेम मशीनरीचा कळ दाबून शुभारंभ करण्यात आला . या आत्याधुनिक मशीनरी कार्यान्वित झाल्याने उत्पादनात व उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे .

सूतगिरणीचे व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व कळ दाबून मशीनरी कार्यान्वित करण्यात आली . यावेळी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे , संचालक बाळासाहेब खैरे , सुमंत महाजन , विलासराव काळेबाग , माणीकराव गोतपागर , डॉ . अशोकराव ऐडगे , सौ . मंगल पवार , सौ . शोभाताई होनमाने , सौ . शाकीदाबी शेख , अमोल चौधरी , दयानंद चव्हाण , रमेश वडे , डॉ . शिवाजीराव जाधव , मंगेश लवटे , राजेंद्र लौंढे , यांच्यासह जनरल मॅनेजर व्हि . एस . देशमुख , फायनान्स मॅनेजर आर . एस . मिरजे , प्रॉडक्षण मँनेजर सुर्यकांत देसाई यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार उपस्थित होते .

स्वागत व प्रस्थाविक श्री . बजरंग कदम यांनी केले . कार्यक्रमाचे संयोजन मेंन्टनस मॅनेजर अमोल देशपांडे , श्रीहरी कुंभार , जावेद पटाण , इंजिनिअरिंग मॅनेजर एस.आय. मेत्री, लेबर ऑफीसर अदित्य यादव यांनी केले . तर शेवटी आभार सिनिअर ऑफीसर अशोकराव बडदे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!