ताज्या घडामोडी

अखेर जोईनेही घेतला निरोप

Spread the love

पालघर प्रतिनिधी ता.२४
पालघर मधील ताराबाग येथील मुक्ताई निवास येथे राहणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या लाडक्या जोईने( श्वान ) गुरुवारी (ता.२४) मुक्ताई कुटुंबाचा निरोप घेतला. मृत्युसमयी जोईचे वय अडीच वर्षे होते.

गेल्या १२ मार्च २०२२ रोजी मुक्ताई कुटुंबातील ज्येष्ठ असलेल्या मुक्ताई जगन्नाथ पाटील यांचे वयाच्या ९५ यावर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मुक्ताई आजींच्या निधनानंतर अवघ्या १३ व्या दिवशीच मुक्ताई परिवाराचा अत्यंत आवडीचा असलेल्या गोल्डन रिट्रीवर जातीच्या जोईने( श्वानाने ) गुरुवारी सकाळी अचानकपणे या परिवाराचा निरोप घेतला.

ताराबाग मध्ये राहत असलेल्या आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या श्रेयस पाटील याला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. त्यांनी १७ नोव्हेंबर २०१९ मध्ये जोई या गोल्डन रिट्रीवर जातीच्या श्वानाला आपल्या घरी आणले. त्यावेळी जोई अवघा ४२ दिवसांचा होता. घरी आणल्यानंतर अवघ्या काही दिवसातच जोई हा मुक्ताई कुटुंबियांचा एक महत्वाचा घटक बनला. कुटुंबाचा जणू काही सदस्यच बनला. लहान मुलांचा तर तो खूपच लाडका झाला. हळूहळू सर्व मुक्ताई कुटुंबियांचा जोई वर लळा लागला.

असा आला जोई मुक्ताई कुटुंबात …

पालघर येथील ताराबाग भागात मुक्ताई कुटुंब राहत आहे. श्रेयसचे आई- वडील व्यवसायाने शिक्षक आहेत. १९ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीसाठी या दोघांनाही इंडोनेशिया देशातील बाली येथील शैक्षणिक परिषदेला उपस्थित राहायचे होते. या परिषदेला राज्यातील फक्त उपक्रमशील शिक्षक सहभागी होणार असल्याने या शैक्षणिक परिषदेला इंडोनेशिया येथे मुलांना घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलांनी एक शक्कल लढवली. आम्ही परिषदेला येणार नाही मात्र आम्हाला एक गोष्ट द्यायची आहे आणि ती म्हणजे घरामध्ये एका श्वानाला आणण्याची परवानगी. नाईलाजाने मुलांना परवानगी देण्यात आली आणि अशा रीतीने जोई चे १७ नोव्हेंबर २०१९ रोजी अनपेक्षितपणे मुक्ताई कुटुंबात आगमन झाले.

मुलांनीच स्वीकारली जबाबदारी…

कुटुंबातील बहुतांश मोठ्यांची इच्छा नसताना सुद्धा अगदीच एक दीड महिन्याच्या लहान जोई ला ( श्वानाच्या पिल्ल्याला) घरी आणल्यापासून श्रेयस त्याची बहीण ऋत्वि आणि चुलत बहिणी आर्या आणि आभा या चौघांनी जोई ला खायला देण्यापासून त्याची आंघोळ करणे, त्याला कपडे घालणे, वेळच्या वेळी डोस देणे, त्याला वॉकला घेऊन जाणे, त्याच्याबरोबर खेळणे आदी जबाबदारी घेऊन त्याची काळजी घेत होते. अगदीच न चुकता वेळच्या वेळी या सर्व गोष्टी त्याच्या करत असत. त्याचे लाड करत असत. कालांतराने श्रेयसची आईसुद्धा त्यांना मदत करत असे.

खाऊच्या पैशातून जोईचा खर्च…

या चारही मुलांनी आपले खाऊचे पैसे वाचवून जोई ला आवश्यक असलेल्या गोष्टी जसे त्याचे खाणे, त्याला झोपायला लागणारी गादी, त्याला लागणारा टॉवेल, शाम्पू, त्याला लागणारी औषधे, त्याला वेगवेगळ्या डोससाठी होणारा खर्च आदी खर्च त्यांनी साठवून ठेवलेल्या खाऊच्या पैशातून करत असत. Covid-19 च्या लॉकडाऊनच्या काळात जेव्हा शाळा- महाविद्यालये बंद होती तेव्हा मुलं घरूनच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असत. त्यामुळे जोईला वेळच्यावेळी खाण देणं किंवा त्याची काळजी घेणे मुलांनाही सोपे झाले होते. कोविडमुळे बऱ्याच घटकांना जरी फटका बसला असला तरी जोईला मात्र त्याचा फायदाच झाला.

आजीच्या निधनाने जॉईला धक्का!…

आजीच्या निधना नंतर हळू-हळू जोईने आहार कमी केला. त्याच्या नेहमीच्या हालचालीही कमी झाल्या. दिवसभर अगदीच उदास अवस्थेत तो बसून राहू लागला. एरवी मुलांच्या बरोबर आनंदाने खेळणारा, घराबाहेर धावत जाणारा जोई घराबाहेर जायलाही तयार होईना. हे श्रेयसच्या लक्षात आल्यावर त्याने तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने त्याला औषध उपचारही सुरु केला. मात्र त्याला यश आलं नाही. आपल्या लाडक्या जोईला सोडून जातांना मुलं तर डसा-डसा रडलीच. यावेळी मोठ्यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. शेवटी जड अंतकरणाने जोई ला निरोप देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!