ताज्या घडामोडी

जागतिक स्तरावर अव्वल क्रमांकाच्या प्रकल्पात रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बुद्रुक या शाळेचा यशस्वी सहभाग

Spread the love

मायक्रोसॉफ्ट या जागतिक कंपनी कडून राबवण्यात आलेल्या TECH FOR GOODS CHALLENGE 2022 विविध पुरस्कारांची घोषणा (E2 २०२२ EDUCATION EXCHANGE ) या कार्यक्रमात करण्यात आली. या सोहळ्यात जागतिक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार RISEUP4EWASTE या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला जाहीर करण्यात आला. यात HEALTH & WELL BEING SDG3 या विभागामध्ये या प्रकल्पाला प्रथम पुरस्कार देण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात चिपळूण तालुक्यातील रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बुद्रुक या शाळेच्या एकूण 30 विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.
सदर RISEUP4EWASTE हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प १ डिसेंबर २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शाळास्तरावर राबविण्यात आला. हा प्रकल्प जगाला भेडसावणाऱ्या ई – कचरा या जागतिक समस्येची जाणीवजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी राबविण्यात आला होता. यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपल्या स्वरचित चित्रे, कविता, VIDEO, PPT,नाटिका , ANIMATED VIDEO, लेख या माध्यमातून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाय सुचविले. या प्रकल्पात ३६ देशांमधील ५५० TEACHER EDUCATOR व जवळपास ७००० विद्यार्थी सहभागी झाले होते. हा प्रकल्प परमजीत कौर जालंधर पंजाब , निर्मलादेवी कंदास्वामी मलेशिया , लोरा स्तांसिऊ रुमानिया आणि डॉ.बी.बी.पाटील कोल्हापूर या ग्लोबल प्रतिनिधींनी हा प्रकल्प मायक्रोसॉफ्ट समोर सादर केला होता. लवकरच या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
या प्रकल्पासाठी या शाळेतील सहाय्यक शिक्षक तंत्रस्नेही शिक्षक, आणि MIE EXPERT म्हणून नावारूपाला आलेले श्री. मयुरेश माने सर यांनी CO- ORDINATOR म्हणून काम पाहिले. श्री.मयुरेश माने सर यांना व शाळेतील इ.५ वी ते १० वीतील एकूण 30 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणि शाळांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पामध्ये यशस्वी सहभाग नोंदवल्याबद्दल रत्नाकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरिता घाग आणि सचिव हेमकिरण घाग आणि सर्व संस्था सदस्य यांनी मनापासून कौतुक केले आहे.
ग्रामीण भागातील अजूनही मुलांमध्ये नाविन्यता, आणि कल्पक दृष्टी
ग्रामीण भागातील मुलांमध्ये नाविन्यता, आणि कल्पक दृष्टी भरपूर असल्याने उपक्रम राबवताना त्यामध्ये रेखीवपणा, जीव ओतण्याची कला अजूनही दिसून येते. मुलांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर मुले स्वतःच्या नावासह शाळेचे नांव आणि आपला अव्वल दर्जा सातासमुद्रापारही सिद्ध करू शकतात. श्री.मयुरेश माने सर नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असतात. त्यांनी व त्यांच्या टीमने राबवलेल्या या उपक्रमाचा जगात प्रथम क्रमांक येणे ही गोष्ट गावासह संपूर्ण जिल्हाला भूषणावह आहे हे नक्की…. असे अभिमानास्पद उदगार शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश पांडुरंग भंडारी यांनी काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!