ताज्या घडामोडी

कविभूषण, शब्दसम्राज्ञी डॉ.सौ. जयश्री श्रेणिक पाटील यांना “मा.अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार,२०२२

Spread the love

खासदार मा. धैर्यशील माने-साहेब यांच्या हस्ते प्रदान व ज्येष्ठ नेते मा.अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..लोकराज्य विद्या फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त उरूण- इस्लामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर मधील सार्वजनिक स्मशानभूमीत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सामाजिक कार्य प्रबोधन पर व्याख्याने, वैद्यकीय, सांस्कृतिक, व साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सांगली येथील वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर च्या प्रमुख व एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम आर आय तज्ञ .डॉ.सौ.जयश्री श्रेणिक पाटील यांना सन्मानचिन्ह,मानपत्र, काठी- घोंगडे,वृक्षरोप आणि मा.अण्णासाहेब डांगे(आप्पा) लिखित अहिल्यादेवी होळकर चरित्र ग्रंथ देवून “मा.अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.*
पुरस्कार मनोगत व्यक्त करताना *डॉ.जयश्री श्रेणिक पाटील म्हणाल्या की हा पुरस्कार माझ्या माहेरच्या माणसांनी दिलेला पुरस्कार आहे आणि याचा अतिशय आनंद होतोय कारण एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा नावाने दिलेला हा पुरस्कार आहे आणि आत्तापर्यंत शॉ ल घेऊन अनेक पुरस्कार स्वीकारले पण आज घोंगड खांद्यावर घेऊन पुरस्कार स्वीकार ल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा व पुन्हा नवनिर्मितीची प्रेरणा व्यासपीठावरच मिळाली आणि सुंबरान मांडलं ग सुंबरान मांडलं या ओवी च्या चालीत त्यांना सामाजिक आशयाची अतिशय मार्मिक अशी ओवी स्फुरली व उत्स्फूर्तपणे ती गाऊन ,उखाणे कवितेच्या माध्यमातून सामाजिक रूढी परंपरांना छेद देऊन समाजमनावर प्रकाश टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला व स्मशाभूमीत येऊन पुरस्कार स्वीकारणारी *पहिली धाडसी रणरागिणी* हा बहुमान मिळवला त्याबद्दल सर्वांनी डॉ.जयश्री श्रेणिक पाटील (डॉक्टर माई) यांचे कौतुक व अभिनंदन केले.

*डॉ जयश्री पाटील असेही म्हणाल्या
*माणसाने असे जगावे*
*की सर्वांनी वंदन करावे*
*आणि असे मरावे की*
*सर्वांनी स्मरण करावे*…..

यावेळी जे के.बापू जाधव यांना ही हा पुरस्कार देण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक लोकराज्य विद्या फौंडेशनचे संस्थापक, युवा सामाजिक कार्यकर्ते मा.चंद्रशेखर प्रकाशराव तांदळे यांनी केले.

मा.आमदार भगवानराव साळुंखे. जे.के.बापू जाधव प्रा. अरुण घोडके, प्राचार्य मा.संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.राहूलदादा महाडिक, हुतात्मा दुध संघाचे अध्यक्ष मा.गौरवभाऊ नायकवडी, माजी नगराध्यक्ष मा.आनंदराव मलगुंडे(दादा),माजी उपनगराध्यक्ष मा. संजयअण्णा कोरे,माजी नगरसेवक विक्रमभाऊ पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष मा.धैर्यशील मोरे, शिवसेना तालुकाध्यक्ष मा.सागर मलगुंडे, जिल्हा परिषद मा. सदस्या .अलकाताई पुजारी, मा.आदिनाथ चौधरी, लोकराज्य विद्या फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा कोळेकर,सौ.आशा तांदळे,मा.बाजीराव हिरवे,सौ.स्वाती तांदळे आदी मान्यवरांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मा. प्रकाश रसाळ यांनी केले. तर आभार मा.अंजली तांदळे यांनी मानले.कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!