ताज्या घडामोडी

स्व. दिलीप करंगुटकर स्मृती आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा १ एप्रिलपासून

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सल्लागार स्व. दिलीप करंगुटकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा १ एप्रिलपासून क्रॉस मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे होणाऱ्या स्पर्धेला  माझी माऊली-जेजे परिसर सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ व कौंटी क्रिकेट क्लब यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेतील पहिल्या चार संघांना तसेच वैयक्तिक स्वरुपात बक्षिसे दिली जाणार आहेत.

क्रीडापटूना प्रोत्साहन देणारे ज्येष्ठ समाजसेवक स्व. दिलीप करंगुटकर यांचे कार्य भविष्यातही स्मरणात राहण्यासाठी संयोजक गोविंदराव मोहिते, लीलाधर चव्हाण व क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यानिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू चंद्रकांत नाईक, अनिल शेलार, निलेश पारकर, भरत पेडणेकर, सुभाष शिवगण, नरेश शिवतरकर, शशिकांत वैद्य, अविनाश दुधाणे आदी खेळाडूंचा गौरव देखील होणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी प्रवेशासाठी क्रिकेट संघटक अभिजित घोष अथवा अनिकेत करंगुटकर (९९८७८३१६२२) यांच्याकडे २५ मार्च- दु.३००वा. पर्यंत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!