महाराष्ट्र

मार्च महिन्यात सलग चार दिवस बँका राहणार बंद

Spread the love

पुणे : सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण व नवा कामगार कायदा या विरोधात सर्व मध्यवर्ती कामगार संघटना, कर्मचारी संघटना आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार संघटनांनी 28 व 29 मार्च रोजी संपाचा निर्णय घेतला आहे. यामुळे चौथ्या शनिवारी (26 मार्च) रविवारी( 27 मार्च) आणि 28 व 29 मार्च संपामुळे अशा सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

या संपात पाच लाखाहून अधिक बँक कर्मचारी अधिकारी सहभागी होणार आहेत. संपात बँक अधिकाऱ्यांची ऑल इंडिया बँक ऑफीसर असोसिएशन सहभागी होत आहे.त्यामुळे स्टेट बँक वगळता इतर सर्व बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदार तुळजापूरकर यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!