ताज्या घडामोडी

मुंबईचे माजी महापौर, चेंबूरचे शिल्पकार शरदभाऊ आचार्य यांचा स्मृतिदिन साजरा

Spread the love

मुंबई – चेंबूरचे शिल्पकार आणि मुंबईचे माजी महापौर स्व.शरदभाऊ आचार्य यांचा २३ वा स्मृतिदिन शिवसेना शाखा क्रमांक १४७ च्यावतीने स्थानिक नगरसेविका अंजली नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशी नाका येथील इंदिरा नगर मधील हनुमान मंदीर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पार पडलेल्या आदरांजली सभेस प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, विभागप्रमुख मंगेश सातमकर, माजी नगरसेवक माणिकराव पाटील, नगरसेवक श्रीकांत शेट्ये, भाजपचे विरसिंग देवडिया, रिपाइं चे बाळासाहेब बनसोडे, मनसेचे मंगेश पडळकर , शिवसेना शाखाप्रमुख अविनाश शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी दिवंगत शरदभाऊ आचार्य यांचा सहवास लाभलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. शरदभाऊ आचार्य हे केवळ गोरगरिबांना निवारा देऊन थांबले नाहीत तर त्यांनी मराठी माणसाच्या हाताला काम मिळावे याकरिता संघर्ष उभा केला. मराठी तरुणांना सक्षम करण्यासाठी त्यांनी शाळा, कॉलेज सुरू केली. तसेच सामाजिक अस्मिता जपली जावी म्हणून महापुरुषांचे पुर्णाकृती पुतळे उभे केले. म्हणून येथील जनतेने त्यांना चेंबूरचे शिल्पकार ही उपाधी दिली. त्यांच्या कार्याची महती ऐकून अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या स्व. शरदभाऊ आचार्य यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!