कृषीवार्ता

नेवासा तालुका खरेदी विक्री संघ प्रगती समाधानकारक- डॉ ढगे

Spread the love

नेवासा नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 2021 साठी खेळीमेळीच्या व विधायक चर्चेने पार पडली याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉअशोकराव ढगे यांनी चेअरमन प्रभाकर कोलते व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी केलेल्या कष्टा बद्दल अभिनंदन केलेखरेदी विक्री संघ पूर्वी 18 लाख रुपये तोट्यात होतातथापि चांगला कारभार करून आज संघाची वाटचाल आठ लाख रुपये नफास्वरूपात होत आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार डॉक्टर ढगे यांनी काढले वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रभाकर कोलते होतेमॅनेजर पठारे यांनी अहवालाचे वाचन केले सर्व संचालकांनी चर्चेमध्ये भाग घेऊन साधक-बाधक सूचनाकेल्या यापुढील काळात संघाची वाटचाल चांगली होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये विश्वासहार्यतानिर्माण होत आहे नवीन पद्धतीचे खते त्याचबरोबर कृषी विद्यापीठाने संशोधनकेलेल्या नवीन पिकांच्या जाती चे बीबियाणे उपलब्ध करणे तसेच जैविक खते सुक्ष्म अन्नद्रव्ये युक्त खते शेतकऱ्यांना पुरवणव जमिनी सुधारण्यासाठी जिप्सम खताचा पुरवठा करणे आवश्यक असल्याची चर्चा झाली
खरेदी-विक्री संघाला नामदार शंकरराव गडाख यांची मार्गदर्शन तसेचपाठबळ मिळत असल्याबद्दल सभेमध्ये सर्वानुमते त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!