आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

पुणे व सोलापूर जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व सचिव यांची बारामती येथे कार्यशाळा संपन्न..

Spread the love

पुणे व सोलापूर जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व सचिव यांची बारामती येथे कार्यशाळा संपन्न..The workshop of Pune and Solapur District Agricultural Produce Market Committee Officers and Secretary was concluded at Baramati.

आवाज न्यूज : बारामती प्रतिनिधी २ डिसेंबर.

महाराष्ट्र राज्य कृषि मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था,तळेगाव दाभाडे, जि. पुणे (NIPHT) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १ डिसेंबर, रोजी सभागृह, कृषी महाविद्यालय, शारदानगर, बारामती येथे पुणे व सोलापूर जिल्ह्य़ातील बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांची पणन विषयक कार्यशाळा संपन्न झाली.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता राजेंद्र दादा पवार, अध्यक्ष, के. व्ही. के. बारामती यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री सुरवसे वरीष्ठ विपणन अधिकारी,  विजय पाखले, विशेष लेखा परीक्षक , डॉ. सुभाष घुले संचालक  राजेंद्र महाजन उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, पुणे , संदीप जाधव उपनिबंधक, कराड,  मिलिंद टंकसाले सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था , पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र दादा पवार प्रास्ताविक करताना बाजार समित्यांनी शेतकरी केंद्र स्थानी ठरून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याची सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष घुले यांनी मा.नामदार.अब्दुल सत्तार मंत्री, पणन यांचे संकल्पनेतून व  संजय कदम ,कार्यकारी संचालक व  विनायक कोकरे सर व्यवस्थापक ,कृषि पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सदर कार्यशाळेच्या निमित्ताने पणन संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके यांची पुस्तिका तयार करण्यात आलेली असून ती पुस्तिका बाजार समित्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सचिवांना बाजार समितीचे कामकाज करताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.सदर कार्यशाळेत कृषि पणन कायदा व त्यामधील महत्त्वाच्या सुधारणा याबाबत संदीप जाधव उपनिबंधक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच बाजार समितीचे अधिकार व कर्तव्य याबाबत  मिलिंद टांकसाले सहा निबंधक यांनी मार्गदर्शन केले.केंद्र शासनाच्या कृषि पणन विषयक असणाऱ्या विविध योजनासंबंधी  ऋग्वेद सुरवसे ,उप कृषी पणन सल्लागार मुंबई यांनी मार्गदर्शन केले शेतमालाची निर्यात व कृषि पणन मंडळाचे योगदान याबाबत श्री अनंत सावरकर सहा. व्यवस्थापक व्यवस्थापक, यांनी मार्गदर्शन केले तसेच बाजार समित्यांसाठी असणाऱ्या पणन मंडळाच्या विविध संगणक प्रणाली यासंदर्भात कैलास फटांगरे, व्यवस्थापक संगणक यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती उपसभापती व समिती सदस्य व सचिव उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या रँकिंगमध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेल्या बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री सुनील पवार आणि व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ आणि सचिव श्री अरविंद जगताप यांचे मा. राजेंद्र पवार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी राजेंद्र महाजन उपसरव्यवस्थापक यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळेनंतर सर्व उपस्थितांन के. व्ही. के. परिसरातील सर्व प्रकल्पांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले.झ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!