मावळराजकीय

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदीगणेश काकडे यांची निवड.

Spread the love
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदीगणेश काकडे यांची निवड.Selection of Maval Taluka NCP Senior Vice President Padiganesh Kakade.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १ डिसेंबर.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांची निवड करण्यात आली आहे.  त्यांनी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष भेगडे,शिक्षण मंडळ सदस्य विशाल पवार,माजी नगरसेवक अशोक भेगडे, नंदकुमार कोतूळकर, रामभाऊ गवारे, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर मुलाणी, विकी लोखंडे, महिला अध्यक्षा तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस शैलजा काळोखे,माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले.

नव्या जबाबदारीसह पक्ष बळकट करण्याबरोबरच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजकार्यासाठी योगदान देऊ हा विश्वास आहे असे काकडे यांनी सांगितले. आगामी काळात संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पक्षाचे कार्य पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे काकडे म्हणाले.

वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!