नगरपरिषदमहाराष्ट्रमावळ

तळेगांव-दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एन.के. पाटील यांची बदली..

विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त महानगरपालिका यांना पदस्थापना दिलेल्या पदावर दि.०४.१२.२०२३ रोजी रुजू होण्याचे आदेश.

Spread the love

तळेगांव-दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एन.के. पाटील यांची बदली ; विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त महानगरपालिका यांना पदस्थापना दिलेल्या पदावर दि.०४.१२.२०२३ रोजी रुजू होण्याचे आदेश.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ डिसेंबर.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना,शासन आदेश क्रमांक : एमसीओ-२०२३/प्र.क्र.३६९/नवि-१४ मंत्रालय (मुख्य इमारत), चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मुंबई – ४०० ०३२.

शासन आदेशानुसार दिनांक: ०१ डिसेंबर, २०२३.महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार, खाली नमूद केलेल्या मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली करण्यात येत आहे.

विजयकुमारसरनाईक,सहायक,महानगरपालिका.मुख्याधिकारी, तळेगांव-दाभाडे नगरपरिषद, जि.पुणे.एन.के. पाटील यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर.आयुक्त, गट-अ, पिंपरी-चिंचवड. सरनाईक यांना दि.०१.१२.२०२३ (म.नं.) पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी पदस्थापना दिलेल्या पदावर दि.०४.१२.२०२३ रोजी रुजू होवून, तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.शासनाचे अवर सचिव. अ.का.लक्कस यांच्या सहीने आदेश देण्यात आले आहे.

त्याच्या प्रति, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई.विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, पुणे विभाग, पुणे.जिल्हाधिकारी, पुणे.आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.नगराध्यक्ष, तळेगांव-दाभाडे नगरपरिषद, जि. पुणे.मुख्याधिकारी, तळेगांव-दाभाडे नगरपरिषद, जि.पुणे, विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त, गट-अ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.प्रतिलिपी,मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई, मा. उप मुख्यमंत्री महोदयांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,एन.के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगांव-दामाडे नगरपरिषद, जि.पुणे.प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबईसर्व सह / उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई. यांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!